Fact Check: कन्हैया कुमारचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल, ८ वर्ष जुन्या फोटोमागचं सत्य काय?

नवी दिल्ली : देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी असताना, ईशान्य दिल्लीतील काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमारचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोमध्ये कन्हैया कुमारच्या हातात ड्रिप दिसत असून तो आराम करताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा फोटो शेअर केले जात असून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कन्हैया कुमारवर झालेल्या हल्ल्यामुळे त्याची अशी परिस्थिती झाली असल्याचा दावा केला जात आहे.

असे दावे करणाऱ्या अनेक पोस्टच्या अर्काइव इथे आणि इथे पाहता येतील.

पडताळणीत काय समोर आलं?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये करण्यात आलेला दावा खोटा असल्याचं पडताळणीत समोर आलं आहे. कन्हैया कुमारचा हा फोटो ८ वर्ष जुना आहे. कन्हैया कुमारचा हा व्हायरल फोटो जेएनयू प्रशासनाविरोधात उपोषणाला बसलेल्याचा तेव्हाचा आहे. हा फोटो कन्हैया कुमार आणि इतर विद्यार्थ्यांच्या उपोषणाच्या दहाव्या दिवसाचा आहे.
Fact Check : निवडणुकीच्या गॅरंटीला अर्थ नाही, पंतप्रधान मोदींसाठी अमित शाह असं म्हणाले? जाणून घ्या सत्य
२०१६ मध्ये कन्हैया कुमार आणि इतर विद्यार्थ्यांनी जेएनयू प्रशासनाकडून मिळालेल्या शिक्षेविरोधात उपोषण केलं होतं, कारण त्याच वर्षी ९ फेब्रुवारी रोजी जेएनयूमध्ये मोठा गोंधळ झाला होता. ९ फेब्रुवारी २०१६ रोजी प्रशासनाने चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी काही विद्यार्थ्यांना शिक्षा सुनावली होती. कन्हैया कुमारच्या या व्हायरल फोटोवर क्विंटने गुगल रिव्हर्स इमेज सर्च ऑप्शनचा वापर केला. ६ मे २०१६ रोजी एनडीटीव्हीवर केलेल्या पोस्टमध्ये कन्हैया कुमारचा हाच फोटो आढळला होता, जो या रिपोर्टसोबत अपलोड करण्यात आला होता. पीटीआयच्या हवाल्याने लिहिलेल्या वृत्तानुसार कन्हैया कुमारने त्याची तब्येत बिघडल्याने उपोषण सोडलं होतं.

२०१६ च्या न्यूज रिपोर्ट्स: शिवाय कन्हैया कुमारचा हा फोटो Rediff.com नावाच्या दुसऱ्या न्यूज वेबसाइटवर केलेल्या रिपोर्टमध्ये दिसले. हा रिपोर्ट ७ मे २०१६ रोजी प्रसिद्ध झाला होता. या रिपोर्टमध्ये कन्हैयाने उपोषण संपवत, एम्समधून रजा घेतली असल्याचं लिहिलं होतं. ६ मे २०१६ रोजी अपलोड केलेल्या Patrika.com वरील बातमीसाठी कन्हैया कुमारचा फोटो वापरण्यात आला होता.

निष्कर्ष

ईशान्य दिल्लीच्या स्थानिक नगरसेवक छाया शर्मा यांच्यासोबत पक्षाच्या बैठकीनंतर न्यू उस्मानपूर येथील आप कार्यालयातून बाहेर पडत असताना कन्हैया कुमारवर १७ मे रोजी हल्ला झाला होता. त्यापैकी एकाला अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यानंतरही कन्हैयाने आपला निवडणूक प्रचार सुरूच ठेवला होता. कन्हैया कुमारचा ८ वर्ष जुना फोटो सोशल मीडियावर नुकताच लोकसभा निवडणुकीशी जोडून व्हायरल केला जात आहे.

(This story was originally published by The Quint, and republished by MT as part of the Shakti Collective.)

Source link

fact check newskanhaiya kumar Fact Checkkanhaiya kumar fake claimकन्हैया कुमारकन्हैया कुमार फॅक्ट चेककन्हैया कुमार ८ वर्ष जुना फोटो व्हायरल
Comments (0)
Add Comment