Mehbooba Mufti FIR: पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांच्या विरोधात एफआयआर दाखल, नेमकं काय आहे प्रकरण ?

जम्मूकाश्मीर : पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जम्मू-काश्मीरमधील निवडणूक आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्तीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. निवडणुकीच्या काळात पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती या अनंतनागमधील बिजबेहारा पोलिस स्टेशनबाहेर धरणे आंदोलन केले होते. पीडीपी पोलिंग एजंटना टार्गेट करून अटक केली जात असल्याचा मेहबूबा मुफ्ती यांनी आरोप केला होता. यानंतर त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर प्रतिक्रिया दिली आहे.
PM Modi: ‘मतजिहाद’साठी ओबीसींच्या हक्कांवर गदा; पश्चिम बंगालमधील सभेत मोदींचा तृणमूल काँग्रेसवर घणाघात

मेहबूबा मुफ्ती यांनी पोस्ट मध्ये काय लिहिलं?

मेहबूबा मुफ्ती यांनी आपल्या पोस्ट मध्ये लिहिले आहे की,”एमसीसीचे उल्लंघन केल्याबद्दल माझ्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पीडीपीला सत्तेसाठी सत्य बोलण्याची किंमत चुकवावी लागली आहे. स्थानिक प्रशासनाच्या संगनमताने पीडीपीच्या शेकडो पोलिंग एजंट आणि कामगारांना ताब्यात घेण्याला आमचा विरोध होता. परंतु त्यांचे अजूनही समाधान झाले नाही, त्याच प्रशासनाने आमच्या मतदारांना घाबरवण्यासाठी आणि त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यापासून रोखण्यासाठी पारंपारिक पीडीपीच्या बालेकिल्ल्यांमध्ये घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. उल्टा चोर कोतवाल को डांटे”

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात (२० मे) रोजी जम्मू काश्मीर आणि लडाखमधील ४९ जागांवर मतदान पार पडलं आहे. यामध्ये जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्यासह २० उमेदवार रिंगणात होते.

Source link

election polling agentJammu and kashmirMehbooba Muftiपीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती मेहबूबा मुफ्ती मेहबूबा मुफ्ती एफआयआरमेहबूबा मुफ्ती न्यूज
Comments (0)
Add Comment