Apple WWDC 2024: तारीख आणि वेळ
Apple च्या मते, WWDC इव्हेंट 10 जूनपासून सुरू होईल आणि 14 जून 2024 पर्यंत चालेल. हा कार्यक्रम भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता सुरू होईल. कंपनीच्या अधिकृत यूट्यूब चॅनल आणि सोशल मीडिया हँडल्सवर हा इव्हेंट लाइव्ह पाहता येईल.
iOS 18 ऑपरेटिंग सिस्टिमचे होणार लाँचिंग
बहुचर्चित ऑपरेटिंग सिस्टम iOS 18 Apple च्या मेगा इव्हेंटमध्ये लॉन्च होणार आहे. यासह, iPad 18, watchOS आणि macOSचे अपडेटेड व्हर्जन सादर केले जाईल. याशिवाय AI फीचर्सबाबत मोठ्या घोषणाही या कार्यक्रमात केल्या जाऊ शकतात.
अलीकडील मीडिया रिपोर्ट्सनुसार, Apple देखील GenAI मॉडेल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे, जे ओपन AI च्या चॅट GPT ला टक्कर देऊ शकते. AI तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या फिचर्सचा यात सपोर्ट असण्याची शक्यता आहे. याबाबत फारशी माहिती मिळालेली नाही. कार्यक्रमादरम्यानच खरी माहिती समोर येईल.
Apple मॅकबुक एअरचे डिटेल्स
अमेरिकन कंपनी Apple ने यावर्षी मार्चमध्ये एका इव्हेंटचे आयोजन करून नवीन जनरेशन मॅकबुक एअर लॉन्च केले होते. या लॅपटॉपची किंमत 1,14,900 रुपयांपासून सुरू होते. फिचर्सनुसार, Apple च्या लॅपटॉपमध्ये 24GB पर्यंत RAM आणि 2TB पर्यंत SSD स्टोरेज देण्यात आले आहे. यात अपडेटेड M3 चिप देण्यात आली आहे. कंपनीने क्लेम केला आहे की हा प्रोसेसर जुन्या चिप 60 पेक्षा 60 टक्के फास्ट असेल.
Apple MacBook Air 2024ची डिजाइन शानदार करण्यात आली. आहे शिवाय त्यात 13-इंचाचा डिस्प्ले आहे. त्याचा पीक ब्राइटनेस 500 निट्स आहे. यात स्पीक-टू-टेक्स्ट आणि टेक्स्ट प्रेडिक्शन सारख्या एआय फीचर्स देण्यात आले आहे. कनेक्टिव्हिटीसाठी लॅपटॉपला वाय-फाय 6ई आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आला आहे.