पोर्शेनंतर आता फॉर्च्युनर अपघात दोघांचा जागीच मृत्यू, हृदयद्रावक घटनेने हळहळ

मुंबई : भाजप लोकसभा उमेदवार करण भूषण सिंह यांच्या गाडीच्या धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू झालाय. बृजभूषण सिंह यांचा मुलगा म्हणून ओळख असलेल्या करण भूषण सिंह यांना उत्तरप्रदेशमधील कैसरगंज लोकसभा जागेवरुन उमेदवारी मिळाले. करण भूषण सिंह यांच्या ताफ्यातील फॉर्च्यूनर गाडीने दुचाकीला धडक मारल्याची घटना घडली. घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची बातमी समोर येत आहे. रस्त्यावरुन जाणारी एक महिला सुद्धा घटनेत गंभीर जखमी झाल्याचे समोर येत आहे.

उत्तरप्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील करनैलगंज हूजरपुर मार्गावरुन करण भूषण सिंह यांचा ताफ जात होता त्यादरम्यान बैकुंठ डिग्री कॉलेजनजीक रस्ता पार करणाऱ्या बाइकस्वाराला करण सिंह यांच्या ताफ्यातील फॉर्च्यूनर गाडीने चिरडले. अपघात इतका भीषण होता की बाइकस्वार आणि मागील सीटवरील साथीदार सिनेमातील दृश्याप्रमाणे उडून रस्त्याच्या पुढे काही अंतरावर जावून निपचित पडले तर आणखी दोघेजण गंभीर जखमी झालेत. अपघातात फॉर्च्यूनरला सुद्धा मोठा फटका बसलाय तसेच रस्त्यावरुन रहदारी करणाऱ्या पादचाऱ्यांना सुद्धा गंभीर दुखापत झाले.
जळगावात ४ जणांना चिरडून मारलं, आरोपींच्या मागे राजकीय वरदहस्त, यंत्रणा सुस्त-कारवाई धीम्या गतीने!

अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात तनाव झाल्याचे चित्र दिसून आले. संतापलेल्या जमावाने जिल्हा रुग्णालयाला घेराव घालत, मृतदेहाचे शवविच्छेदन करु नका अशी मागणी केली. पोलिस आणि संतप्त जमावामध्ये बाचाबाची झाल्याचे पण पाहायला मिळाले. अखेर शर्थीच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला तसेच संतप्त जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला.


घटना घडली तेव्हा करण भूषण सिंह ताफ्यात होते की नाही यांची माहिती अजून मिळू शकली नाही. पिडीतांच्या कुटुंबानी घटनेची तक्रार दाखल केली आहे पण एफआयआर मध्ये करण भूषण सिंह यांचा नावाचा उल्लेख नाही तसेच प्रत्यदर्शीच्या मते त्यावेळी ताफ्यामध्ये करण सिंह नव्हता असे सांगण्यात येत आहे. अपघातात असलेली फॉर्च्यूनर गाडी नंदनी एज्युकेशन इंस्टीट्यूट नावाने रजिस्टर असल्याचे समजते. याच इंस्टीट्यूटचे संस्थापक कैसरगंजचे खासदार बृजभूषण सिंह आहेत, तर हा ताफा बृजभूषण सिंह यांचे छोटे सुपुत्र आहेत.

Source link

brij bhushan singh sonbrijbhushan singhkaran bhushan singhkaran bhushan singh accident newslok sabha electionup
Comments (0)
Add Comment