४६ वर्षीय बंसी लाल यांचा मृत्यू चढाईदरम्यान ऑक्सिजनच्या अभावामूळे व अतिउंचीच्या ठिकाणी असलेल्या हवेच्या कमी दाबामूळे झाल्याची माहिती गिर्यारोहण अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती आहे. यामूळे माऊंट एव्हरेस्ट येथे झालेल्या मृत्युंची संख्या आता आठवर पोहोचली आहे. यामध्ये तीन लोकांचा समावेश असून एक ब्रिटिश गिर्यारोहक तर दोघा नेपाळी गिर्यारोहन मार्गदर्शकांचा समावेश आहे. तिघांचाही अद्याप तपास लागला नसून प्रशासनाने त्यांना मृत समजले आहे.
या सिजनमधील ही तिसरी मृत्यूची नोंद घटना असून ही संख्या मागिल वर्षीच्या मृत्युच्या आकड्यांच्या तुलनेत कमी असल्याचे म्हटले जात आहे.जगातील सर्वात उंच ठिकाणी गिर्यारोहकांसाठी २०२३ हे वर्ष आतापर्यंत सर्वाधिक धोकादायक ठरले.२०२३ मध्ये जवळपास १८ मृत्यूच्या घटना नोंदविण्यात आल्या होत्या.
माऊंट एवरेस्ट मध्ये होणाऱ्या सर्वाधिक घटना या ८००० मीटर उंचीवर होतात.जिथे हवेचा दाब अत्यल्प असतो व ऑक्सिजनची कमी पातळी ही ‘माऊंटेन सिकनेस’ साठी म्हणजेच अतिउंचीच्या ठिकाणी असलेल्या कमी हवेच्या दाबाने व ऑक्सिजनच्या कमतरतेमूळे होणाऱ्या एका आजारास कारणीभूत ठरते. ज्यामध्ये आपण जितक्या उंचीवर जातो तितकी माऊंटेन सिकनेस होण्याची शक्यता जास्त असते.त्यामूळे या भागाला ‘डेथ झोन’ म्हणतात.
गेल्या आठवड्यात बिनोद बाबू बस्तकोटी या ३७ वर्षीय नेपाळी गिर्यारोहकाचा शिखरावरुन उतरत असताना या तथाकथित डेथ झोन मध्ये मृत्यू झाला होता.