AC Vs Cooler: कोणता ठरेल बेस्ट ऑप्शन, जाणून घ्या

जर तुम्ही एसी किंवा कूलर घेण्याचा विचार करत असाल तर सर्वोत्तम पर्याय कोणता असेल? हे खरेदीकरण्यापूर्वी तुमचा देखील गोंधळ उडतो आहे का? हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी आम्ही SPPLचे सीईओ अवनीत मारवाह यांच्याशी यांच्याशी संवाद साधला यावेळी त्यांनी सांगितले की AC किंवा कुलर घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

AC च्या तुलनेत भारतात एअर कूलरची मार्केट साईज खूप जास्त आहे. एअर कूलर हे एअर कंडिशनरपेक्षा भारतीय ग्राहकांच्या जास्त पसंतीस उतरला आहे. आजच्या आधुनिक काळात एअर कूलर अधिक अपडेट झाले आहेत. तसेच यात हवेचा स्पीड देखील चांगला देण्यात येत आहे. सध्या बाजारात 100, 105 आणि 150 लिटर क्षमतेच्या कुलरची मागणी वाढली आहे. तर दुसरीकडे, एअर कंडिशनिंग मार्केटसमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत.

महागड्या कूलरपेक्षा एसी घेणे योग्य ठरेल का?

आगामी काळात परवडणाऱ्या एअर कूलरच्या रेंजमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे. आजच्या युगात अनेक एअर कूलर ब्रँड्सची किंमत एअर कंडिशनरपेक्षा जास्त आहे, परंतु आपण सर्वात कमी किमतीत मिळणाऱ्या 150 आणि 105 लिटरचे एअर कुलर्सबद्दल जाणून घेणार आहोत. त्याची सुरुवातीची किंमत 10,000 रुपये आहे, जी एसीच्या तुलनेत खूपच कमी आहे.

या कूलरमध्ये BLDC मोटर देण्यात येते. BLDC मोटरमुळे कूलरचा सेल वाढला आहे. तसेच, 19 इंचाचा स्टील ब्लेड फॅन हा या मार्केटमध्ये 105 आणि 115 लिटरच्या रेंजमधील सर्वोत्तम फॅन समजला जातो.

काय खरेदी करणे योग्य ठरेल?

एअर कूलर किंवा एअर कंडिशनर खरेदी करण्याचा डिसिजन रूम साईज, वेदर आणि तुमचे बजेट यासारख्या अनेक घटकांवर अवलंबून असतो. तुमची रूम साईज असेल तर एअर कूलर हा चांगला पर्याय ठरू शकतो. परंतु, जर तुमची रूम साईज मोठी असेल तर एअर कंडिशनर अधिक प्रभावी ठरू शकतो. यावेळी तुमचे बजेट विचारात घेणे देखील महत्त्वाचे आहे, कारण एअर कूलरपेक्षा एअर कंडिशनर खरेदी करणे आणि मेंटेन करणे जास्त महाग आहे.

Source link

AC vs Coolerair conditionerAir CoolerBLDC Motorएअर कंडिशनरएअर कूलरएसी विरुद्ध कूलर
Comments (0)
Add Comment