घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरट्यांना हिंजवडी पोलिसांनी केली अटक…

तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख

घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरट्यांना हिंजवडी पोलिसांनी केली अटक…पिंपरी चिंचवड (प्रतिक भोसले) – घरफोडी आणि जबरी चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर हिंजवडी गुन्हे शोध पथकाने शिताफीने अटक केली आहे. या मध्ये पोलिसांनी ९ गुन्हे उघड करून सोने चांदी-दागिने आणि ईतर असा एकूण ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. १) दयामान्ना यल्लाप्पा शिवपुरे (वय-४२ वर्षे) रा.शिवाजीनगर दत्तमंदीराचे मागे, देहुरोड पुणे २) दुर्गाप्पा श्रीक्रिष्णा श्रीराम (वय-४५ वर्षे), रा.शिरालींग नगर जुना बिडी घरकुल सोलापुर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.या बाबत अधिक माहिती अशी की,

{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{“border”:1,”addons”:2},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:true,”containsFTESticker”:false}

(दि.२३मे) रोजी फिर्यादी नामे अभिजीत गोकुळदास मारवाडी (वय-३८ वर्षे) धंदा-नोकरी रा.घर नं -ओ/७०१, आमोरा होम्स कस्प्टे वस्ती, ता. मुळशी, जि.पुणे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन हिंजवडी पोलीस ठाणे गुरनं ६६९/२०२४, भा.द.वि. कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास करीत असताना (दि.२४मे) रोजी राम गोमारे, सहायक पोलीस निरीक्षक यांना गोपनीय बातमीदार यांचेमार्फत खात्रीशिर बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी नामे १) दयामान्ना शिवपुरे २) दुर्गाप्पा श्रीराम यांनी केलेला असुन ते हिंजवडी भागात येणार असल्याची खबर मिळाल्यावरुन वरील आरोपींबाबत हिंजवडी पोलीस ठाणेचे सपोनि राम गोमारे, व गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांनी त्यांना सापळा लावुन ताब्यात घेवून आरोपी नामे १) दयामान्ना यल्लाप्पा शिवपुरे (वय-४२ वर्षे) रा.शिवाजीनगर दत्तमंदीराचे मागे, देहुरोड पुणे २) दुर्गाप्पा श्रीक्रिष्णा श्रीराम (वय-४५ वर्षे), रा.शिरालींग नगर जुना बिडी घरकुल सोलापुर यांस पकडुन त्यांना (दि.२४मे) रोजी ००/३५ वा. अटक केली. त्यांचे रेकॉर्ड तपासले असता आरोपी क्रमांक १ याचेवर यापुर्वी देहुरोड पो.स्टे., चतुश्रृंगी पो.स्टे., हिंजवडी पो.स्टे. निगडी पोलीस ठाणे, पिंपरी पोलीस ठाणे येथे चोरी व घरफोडी चोरीचे १२ गुन्हे दाखल असल्याचे समजले. त्या अनुषंगाने आरोपींकडे तपास केला असता त्यांनी हिंजवडी पोलीस ठाणे गुरनं ६६९/२०२४, भा.द.वि. कलम ४५४, ४५७, ३८० गुन्हयातील चोरीस गेलेले सोन्याचे काही दागिने काढुन दिले. आरोपींनी गुन्हे केल्याचे कबुल केल्याने त्यांचेकडुन एकुण १० तोळे ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे – तसेच चांदीचे दागिने असे एकुण ४,८०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हा हस्तगत केला असुन ०९ गुन्हे उघडकीस आणले आहेत.अशा प्रकारे सदरची कारवाई विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, बापु बांगर, पोलीस उप आयुक्त परि.२ पिंपरी चिंचवड, डॉ.विशाल हिरे, सहा.पोलीस आयुक्त, वाकड विभाग पिंचि. यांचे मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कन्हैया थोरात, पोलीस निरीक्षक गुन्हे ऋषीकेश घाडगे, तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस अंमलदार बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, नरेश वलसाने, बापुसाहेब धुमाळ, योगेश शिंदे, कैलास केंगले, कुणाल शिंदे, विक्रम कुदळ, अरूण नरळे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे यांनी केली आहे.

{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[“local”],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{“addons”:2},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:true,”containsFTESticker”:false}
Comments (0)
Add Comment