chipi airport: चिपी विमानतळामुळे कोकणाला मोठा फायदा; मुख्यमंत्र्यांचे ज्योतिरादित्यांना भेटीचे आमंत्रण

हायलाइट्स:

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक.
  • चिपी विमानतळाचा केवळ सिंधुदुर्गलाच नाही, तर संपूर्ण कोकणाला फायदा होईल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
  • मुख्यमंत्र्यांनी ज्योतिरादित्य शिंदेंना दिले महाराष्ट्र भेटीचे आमंत्रण.

मुंबई: राज्यातील विविध विमानतळांच्या विकासाबाबत तसेच त्यातील अडचणी सोडविण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी चिपी विमानतळ (Chipi Airport) सुरू झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यासच नव्हे तर कोकणाला मोठा फायदा होईल, असे सांगून शिंदे यांना महाराष्ट्र भेटीचे निमंत्रण दिले. (cm uddhav thackeray invited minister of civil aviation jyotiraditya scindia for a visit)

यावेळी मुख्यमंत्र्यांनी विशेषतः नांदेड, कोल्हापूर, औरंगाबाद येथील विमानतळांवर अधिक क्षमतेने हवाई वाहतूक सेवा सुरू व्हावी जेणे करून पर्यटक व नियमित प्रवाशांची संख्या वाढेल व या भागांना त्याचा फायदा होईल यादृष्टीने चर्चा केली तसेच काही तांत्रिक अडचणींचे निराकरण करण्याची विनंती केली. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ सुरू होत आहे , त्याचा निश्चितच जिल्ह्याला व राज्याला फायदा होईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- कारखान्यांवर छाप्यासंबंधी रोहित पवारांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, कालच…

या बैठकीत नागपूर, जळगाव, अकोला, सोलापूर, गोंदिया, जुहू, अमरावती येथील हवाई वाहतूक आणि दळणवळण वाढविण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यात राज्य शासन आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाशी अधिक समन्वय वाढविणे तसेच कालबध्द रीतीने काम करावे यावर चर्चा झाली.

क्लिक करा आणि वाचा- आर्यन खानला पकडून आणणाऱ्या के. पी. गोसावीला पुणे पोलिस शोधतायत

या बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव वित्त मनोज सौनिक, एमएडीसीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे तसेच उपस्थित होते.

क्लिक करा आणि वाचा- ड्रग पार्टीवरील कारवाईतील मनीष भानुशाली, के. पी. गोसावी कोण आहेत?

Source link

Chipi airportcm uddhav thackerayjyotoraditya scindiaचिपी विमानतळज्योतिरादित्य शिंदेमुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Comments (0)
Add Comment