बेड परफॉर्मन्समुळे कापला १६ शिक्षकांचा पगार, शिक्षण विभागात धक्कादायक प्रकार; प्रकरण काय?

पाटणा: बिहारचा शिक्षण विभाग पुन्हा एकदा चर्चेत आहे. जमुई जिल्ह्यातील शिक्षण कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या एका आदेशात इंग्रजी शब्दाचं स्पेलिंग चुकीचं लिहिलं गेलं. त्यामुळे शिक्षण विभागावर टिकेची झोड उठली आहे. सोशल मीडियावर अनेकांनी शिक्षण विभागाला धारेवर धरलं आहे. शिक्षण विभागानं बॅड शब्दाचं स्पेलिंग bad ऐवजी bed लिहिली. त्यामुळे अर्थाचा अनर्थ झाला.

शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात अनेक शाळांना अचानक भेटी दिल्या. त्यामुळे अनेक गैरप्रकार उघडकीस आले. बऱ्याच शाळांमधील शिक्षक गैरहजर होते. कामात कसूर करणाऱ्या शिक्षकांची यादी अधिकाऱ्यांनी तयार केली. त्यानंतर जमुई जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी १६ शिक्षकांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी एक पत्र जारी करण्यात आलं.
Pune Car Accident: पोर्शे अपघाताच्या रात्री आमदाराला सव्वा तासात ४५ मिस्ड कॉल्स; दादांची राष्ट्रवादी गोत्यात
१६ शिक्षकांवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा शिक्षण पदाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली. कार्यालयातून आदेश काढला गेला. Bed Performance (बिछान्यावरील कामगिरी) मुळे पगार कापण्यात येत असल्याचं आदेशात नमूद करण्यात आलं. या आदेशात Bad Performance लिहिलं जाणं अपेक्षित होतं. पण बॅड शब्दाची स्पेलिंग चुकली. विशेष म्हणजे एका आदेशात १४ वेळा ही चूक झाली.
Pune Car Accident: आरोपीच्या मित्राची ६ तास चौकशी; पोलिसांच्या हाती खळबळजनक माहिती, काय घडलं ‘त्या’ रात्री?
शिक्षण विभागाच्याच आदेशात स्पेलिंग मिस्टेक असल्याचं प्रकरण सोशल मीडियावर चर्चेत आलं. अधिकाऱ्यांचा आदेश व्हायरल झाला. बेडमुळे त्यांचं बॅड इंग्रजी उजेडात आलं. त्यामुळे जिल्हा शिक्षण पदाधिकारी राजेश कुमार यांच्यावर चांगलीच नामुष्की ओढावली. त्यांनी या प्रकरणी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यांच्या कार्यालयाकडून सुधारित पत्रक जारी करण्यात आल. त्यात शाळेच्या नावाच्या जागी शिक्षकांची नावं लिहिण्यात आली. त्यामुळे जमुईच्या शिक्षण विभागाची बरीच चर्चा झाली.

Source link

BiharEducation Departmentschool teacherबिहारशाळा शिक्षकशिक्षण विभाग
Comments (0)
Add Comment