Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार कासवाची अंगठी बोटामध्ये घालताय? आधी नियम वाचा, अन्यथा सापडाल मोठ्या संकटात

Tortoise Ring :

हल्लीच्या ट्रेंडनुसार बोट सुंदर दिसण्यासाठी आपण अनेक प्रकारच्या अंगठ्या हातात परिधान करतो. त्यातल्या काही अंगठ्या या यश प्राप्तीसाठी देखील घातल्या जातात. परंतु, अनेकांना त्याची पुरेशी माहिती नसल्यामुळे त्यांची शुभ फले किंवा सकारात्मक प्रभाव मिळतोच असे नाही.

सध्या अनेकांच्या बोटांमध्ये कासवाची अंगठी आपल्याला पाहायला मिळते. परंतु, ही अंगठी काही जणांसाठी शुभ असते तर काहीसाठी अशुभ. कासवाची अंगठी ही केवळ आकर्षक दिसत नाही तर ती संपत्ती आणि समृद्धी देखील आपल्याजवळ आकर्षित करते. ज्योतिषशास्त्रात कासवाला शुभ मानले जाते. कासव हा समुद्रातून आलेला असून त्याला लक्ष्मी देवीचे रुप मानले जाते. कासवाची अंगठी धारण केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. त्यामुळे त्या व्यक्तीला आर्थिकतेचा सामना करावा लागत नाही.

वास्तुशास्त्रानुसार कासवाची अंगठी घालताना नकारात्मक ऊर्जा दूर होते. परंतु, कासवाची अंगठी घालताना आपल्याला काही नियम लक्षात ठेवणे आवश्यक आहे. ज्यामुळे व्यक्तीला लाभ मिळू शकतो.

1. कासवाची अंगठी घालण्याचे नियम

चांदीची कासवाची अंगठी घालणे अधिक फायद्याचे मानले जाते. कासवाची अंगठी घालताना कासवाचा चेहरा तुमच्या दिशेने असायला हवा. यासोबतच अंगठी थेट हाताच्या मधल्या बोटात किंवा तर्जनीमध्ये घातली पाहिजे.

2. कासवाची अंगठी घालण्यापूर्वी या गोष्टी करा

कासवाची अंगठी घालण्यापूर्वी ती दुधाने आणि गंगाजलने शुद्ध करावी. यानंतर देवी लक्ष्मीच्या चरणी अंगठी अर्पण करुन श्रीसुक्ताचे पठण करावे. त्यानंतरच कासवाची अंगठी घातली पाहिजे.

3. कोणत्या दिवशी परिधान करावी

कासवाचा संबंध देवी लक्ष्मीशी येतो. त्यासाठी ही अंगठी शुक्रवारी घालणे अधिक शुभ मानले जाते. जर तुम्ही अंगठी काढत असाल आणि पुन्हा घालायची असेल तर लक्ष्मी देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतरच घाला.

4. फायदे मिळतील

ज्योतिषशास्त्रानुसार कासवाची अंगठी धारण केल्याने संयम, शांती आणि आत्मविश्वास वाढतो. तसेच जीवनातील अनेक दोष दूर होतात. असे म्हटले जाते की, कासवाची अंगठी घातल्याने आर्थिक चणचण कमी होते.

टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.

Source link

Vastu RulesVastu TipsVastu Tips For MoneyVastu Tips For SuccessVastu Tips For Tortoise RingVastu Tips For Wealthवास्तु टीप्सवास्तुचे नियमवास्तुशास्त्र
Comments (0)
Add Comment