दुबईहून भारतात आल्यानंतर केली अटक
शिवकुमार हे दुबईहून बुधवारी (२९ मे) भारतात आले. भारतात येताच दिल्ली विमानतळावर शिवकुमार यांच्यासह आणखी दोन व्यक्तींना सोने तस्करीच्या प्रकरणात सीमा शुक्ल विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. तसेच शिवकुमार यांच्याकडून ५०० ग्रॅम सोने देखील जप्त करण्यात आले आहे.
सोन्याची एकूण किंमत ३० लाख रुपये
मिळालेल्या माहितीनुसार, सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिवकुमार यांच्याकडून जप्त केलेल्या सोन्याशी संबंधित कागदपत्रेही मागितली आहे. त्याचबरोबर या सोन्याची सत्यता जाणून घेण्यासाठीचा तपास सुरू करण्यात आला आहे. जप्त केलेल्या सोन्याची एकूण किंमत ३० लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
शशी थरूर यांनी केली पोस्ट
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाबाबत कॉंग्रेसचे नेते शशी थरूर यांनी अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की,” मी या प्रकरणाची माहिती घेतली असून ते चुकीचे आहे. मी अशा चुकीच्या गोष्टींचे समर्थन करत नाही. अटक करण्यात आलेली व्यक्ती माझा जुना स्वीय सहाय्यक आहे. त्यामुळे सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करावी”