Fact Check: आझमगडमधील अखिलेश यादव यांच्या रॅलीत हजारो लोक, व्हिडिओमधून दावा, जाणून घ्या सत्य

नवी दिल्ली: समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची रॅली असल्याचे सांगून त्यांच्या नावे एक व्हिडिओ समाज माध्यमांत जोरदार व्हायरल होत आहे. त्या रॅलीत हजारो लोक बघायला मिळत आहेत. व्हायरल झालेला व्हिडिओ अखिलेश यादव यांच्या आझमगडमधील रॅलीचा असल्याचा दावा केला जातोय.

विश्वास न्यूजने या व्हिडिओच्या खोलात जाऊन तपासणी केली. आजमगड रॅलीच्या नावाने व्हायरल झालेल्या व्हिडिओचा भारतीय निवडणुकांशी काडीचाही संबंध नसल्याचे समोर आले आहे. निवडणुकीदरम्यान ब्राझीलचा व्हिडिओ आजमगडमधील असल्याचा दावा करून काही लोक खोटी चित्रफित समाज माध्यमांत व्हायरल करत आहेत.

कोणती चित्रफित व्हायरल?

फेसबुक युजर्स समाद खान याने २२ मे रोजी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. हा व्हिडिओ आझमगड रॅलीचा आहे, असा त्याने दावा केला होता. सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव आजमगडच्या लोकांचे प्रेम आणि विश्वास जिंकत आहे, पर्यायाने इंडिया आघाडी निवडणुकीत जिंकेल, असे संबंधित युजर्सने म्हटले होते.

फेसबुक पोस्टमधील व्हिडीओ आणि कंटेट खरा मानून अनेक लोकांनी तो मजकूर व्हायरल केला.

पाहणीतून काय समोर?

सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्या रॅलीच्या नावाने व्हायरल झालेल्या व्हिडिओचे सत्य जाणून घेण्यासाठी विश्वास न्यूजने सर्वप्रथम अनेक कीफ्रेम्स काढल्या. त्यानंतर त्यांना गुगल लेन्सने शोध घेण्याचा प्रयत्न केला. आम्हाला bellmarques नावाच्या Instagram हँडलवर एक व्हिडिओ मिळाला. १९ एप्रिल २०२४ रोजी अपलोड केलेला व्हिडीओ ब्राझील येथील असल्याचे आम्हाला पाहायला मिळाले. micaretadefeira.oficial नावाच्या Instagram हँडलवर मूळ व्हिडिओ मिळाला.

विश्वास न्यूजने समाजवादी पक्षाचे प्रवक्ते मनोज राय धुपचंडी यांच्याशी संपर्क साधला. व्हायरल झालेला व्हिडिओवरून त्यांच्याशी चर्चा केली. व्हायरल झालेला व्हिडिओ आजमगडच्या रॅलीचा नसल्याची पुष्टीही त्यांनी आमच्याशी बोलताना दिली. तपासाअंती समद खान Ind या फेसबुक यूजरच्या अकाउंटची चौकशी करण्यात आली. युजर हा मुझफ्फरनगर, यूपीचा रहिवासी आहे. फेसबुकवर राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या या युजरला सहा हजारांहून अधिक लोक फॉलो करतात.

निष्कर्ष

विश्वास न्यूजच्या तपासात ब्राझीलमधील एक व्हिडिओ आझमगढमधील असल्याचे समोर आले आहे. सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्या रॅलीशी या व्हिडिओचा संबंध नाही. व्हायरल पोस्ट दिशाभूल करणारी असल्याचे आमच्या तपासात सिद्ध झाले आहे.

(ही कथा मूळतः विश्वास न्यूजने प्रकाशित केली होती. शक्ती कलेक्टिव्हचा एक भाग म्हणून मटाने पुन्हा प्रकाशित केली आहे.)



Source link

Akhilesh Yadav rallyAkhilesh Yadav rally videoAkhilesh Yadav rally viral videofact checkfact check newsअखिलेश यादव व्हायरल व्हिडिओअखिलेश यादव व्हिडिओफॅक्ट चेकफॅक्ट चेक बातमी
Comments (0)
Add Comment