जर तुमच्या फोनमध्ये ब्लूटूथ सेटिंग ऑन असेल, तर या माहितीकडे दुर्लक्ष करू नका. ब्लूबगिंगचा धोका ब्लूटूथ ऑन असल्यास निर्माण होतो. म्हणजेच, जर तुमच्या फोनमध्ये ब्लूटूथ सेटिंग चालू असेल आणि ते अनोळखी डिवाइसेसला दिसत असेल, तर तुम्हाला ब्लूटूथ पेअरिंग रिक्वेस्ट येऊ शकते.
ब्लूटूथ पेअरिंग रिक्वेस्ट डिक्लाइन करा
तुम्ही अनोळखी डिव्हाइसवरून ब्लूटूथ पेअरिंग रिक्वेस्ट स्वीकारल्यास, तुमचा फोन हायजॅक होऊ शकतो. हॅकर सार्वजनिक ठिकाणी अनेक युजर्सच्या फोनवर ब्लूटूथ पेअरिंग रिक्वेस्ट वारंवार पाठवतो आणि अनेक प्रसंगी तो त्याच्या कटात यशस्वी होतो.
एकदा हॅकरने तुमच्या फोनचा ताबा घेतला की तो फोनवर मालवेअर इन्स्टॉल करू शकतो. एकदा का तुमच्या फोनवर हॅकरचे कंट्रोल आले की फोनमधून खाजगी फोटो आणि व्हिडिओ लीक होऊ शकतात.
हॅकर यूजरच्या फोनमध्ये ट्रॅकिंग फर्मवेअर इन्स्टॉल करू शकतो, ज्याद्वारे हॅकर यूजरचा मागोवा घेऊ शकतो. फोनचे कंट्रोल चुकीच्या हातात गेले तर बँकिंग डिटेल्सही चोरीला जाऊ शकतात.
ब्लूबगिंग कसे टाळावे
- फोनमधील ब्लूटूथ कनेक्शनबाबत काळजी घ्या. कनेक्ट केलेल्या डीवाइसेसच्या दररोज फोन सेटिंग्ज चेक करा.
- डिव्हाइसवर अचानक ब्लूटूथ पेअरिंग रिक्वेस्ट दिसल्यास, त्याकडे दुर्लक्ष करा.
- ब्लूटूथ कनेक्शनसाठी तुमचे स्वतःचे नाव वापरणे टाळा.
- ब्लूटूथ चुकून अनोळखी डिवाईसशी कनेक्ट झाल्यास, फोन रीबूट करा.
- तुमच्या फोनमधील नवीनतम सॉफ्टवेअर अपडेट ठेवा.