Friday Remedies :
हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला संपत्ती आणि समृद्धीची देवी मानले जाते. शुक्रवार हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने आर्थिक परिस्थितीशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. तसेच घरात सुख-समृद्धी येते.
शुक्रवारचा दिवस माता लक्ष्मीसोबत शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. शुक्र हा ग्रह आनंद, विलास, प्रेम, भव्यता, सौंदर्य, संपत्ती आणि प्रणय इत्यादींचा कारक मानला जातो. जर तुम्हाला सतत आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असेल तर शुक्रवारी हे उपाय करुन पाहा.
1. धनप्राप्तीसाठी उपाय
शुक्रवारी लक्ष्मी देवीला लाल बिंदी, सिंदूर, लाल चुनरी आणि लाल बांगड्या अर्पण केल्याने धनाशी संबंधित सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते. दर शुक्रवारी कमळाच्या माळाने लक्ष्मीचा जप करा. असे केल्याने देवी लक्ष्मीचा तुमच्यावर आशीर्वाद राहिल. तसेच संपत्तीही मिळेल.
2. शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करा
शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने आर्थिक परिस्थितीशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. घरात सुख-समृद्धीही येते. देवी लक्ष्मी सोबत शुक्रवारचा दिवस शुक्र ग्रहाशी देखील संबंधित आहे. त्यामुळे कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी शंकराला पांढरे फूल अर्पण करा
3. शुक्रवारचा उपवास
शुक्रवार देवी लक्ष्मी आणि संतोषीला समर्पित आहे. देवी संतोषी ही श्रीगणेशाची कन्या मानली जाते. तिची पूजा केल्याने जीवनातील अनेक समस्या दूर होतात. जीवनात सुख-समृद्धी येते. १६ शुक्रवारी संतोषी मातेचे व्रत केल्याने आर्थिक चणचण दूर होते. या दिवशी उपवास केल्याने आंबट पदार्थांचे सेवन करु नये.
4. शुक्रवारी पूजा कशी करावी?
शुक्रवारी घरी पूजा करताना कापूर अवश्य जाळा. संध्याकाळच्या वेळी तिळाच्या तेलाचा दिवा लावा त्यात लवंगही टाका.
चपाती बनवताना पहिली चपाती गाईला खाऊ घाला.
या दिवशी मालमत्तेशी संबंधित काम करणे टाळावे.
शुक्रवारी पैशांचे व्यवहार करु नयेत.
टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.