सर्वात स्वस्त स्वदेशी 5G Phone लाँच; असे आहेत Lava Yuva 5G ची फीचर्स

Lava नं भारतीय बाजारात दमदार Lava Yuva 5G लाँच केला आहे. नवीन स्मार्टफोन दोन स्टोरेज ऑप्शन आणि 5000mAh च्या बॅटरीसह आहे. Lava Yuva 5G मध्ये 6.52 इंचाचा IPS पंच होल डिस्प्ले आणि 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. चला जाणून घेऊया Lava Yuva 5G च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची किंमत इत्यादी.

Lava Yuva 5G ची किंमत

Lava Yuva 5G च्या 4GB रॅम व 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 9,499 रुपये आहे. तसेच 4GB रॅम व 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 9,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन विक्रीसाठी 5 जूनपासून ई-कॉमर्स साइट Amazon आणि Lava E-Store वर उपलब्ध होईल
रेडमी-रियलमीला टक्कर देण्यासाठी येतोय स्वदेशी फोन; तारीख ठरली

Lava Yuva 5Gचे स्पेसिफिकेशन्स

Lava Yuva 5G मध्ये 6.52 इंचाचा IPS पंच होल डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे HD+ (720*1600) रिजोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेट आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 18W चार्जिंगला सपोर्ट करते. या स्मार्टफोनमध्ये 4GB फिजिकल रॅम तर 4GB वर्चुअल रॅम मिळतो. त्याचबरोबर 64GB व 128GB इनबिल्ट स्टोरेज ऑप्शन देण्यात आले आहेत. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं 1TB पर्यंत वाढवता येते. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा कोर UNISOC T750 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 वर चालतो. हा स्मार्टफोन Mystic Green आणि Mystic Blue सह येतो. हा ड्युअल सिम (5G + 5G) ला सपोर्ट करतो.

कॅमेरा सेटअप पाहता, या स्मार्टफोनच्या मागे 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फ्रंटला 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. डायमेंशन पाहता फोनची लांबी 163.36mm, रुंदी 76.16mm, जाडी 9.1mm आणि वजन 208 ग्राम आहे. कनेक्टिव्हिटीसाठी GPRS, 4G, 5G, वाय-फाय, यूएसबी टाइप सी पोर्ट, GLONASS, ब्लूटूथ V5.0, 3.5mm ऑडियो जॅक आणि OTG सपोर्टचा समावेश आहे. या फोनमध्ये अ‍ॅक्सेलेरोमीटर सेन्सर, प्रोक्सिमिटी सेन्सर, मैग्नटोमीटर सेन्सर आणि अँबीएन्ट लाइट सेन्सर देण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी हा स्मार्टफोन साइड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकला सपोर्ट करतो करतो.

Source link

lavalava yuva 5glava yuva 5g featureslava yuva 5g priceलावा फोनलावा मोबाइललावा स्मार्टफोनस्वदेशी स्मार्टफोनस्वस्त फोन फोन
Comments (0)
Add Comment