Reliance Jio आणि Bharti Airtel दोघेही त्यांच्या निवडक प्रीपेड प्लॅनसह मोफत Netflix सबस्क्रिप्शन देत होते, परंतु Vi युजर्सना कोणत्याही प्लॅनसह हा लाभ मिळत नव्हता. आता कंपनीने दोन प्रीपेड प्लॅन लाँच केले आहेत, ज्यामध्ये यूजर्सना नेटफ्लिक्सचा मोफत आनंद घेण्याचा ऑप्शन मिळणार आहे. या प्लॅन्समध्ये मिळणाऱ्या इतर बेनिफिट्सबद्दल जाणून घेऊया.
Vi मोफत Netflix प्लॅनची किंमत किती आहे?
या प्लॅनसह रिचार्ज केल्यावर ग्राहकांना 70 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते आणि हा प्लॅन दररोज 1.5GB डेटा ऑफर करतो. अशा प्रकारे, एकूण 105GB डेटा व्यतिरिक्त, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS पाठविण्याचा ऑप्शन मिळतो. यासह, नेटफ्लिक्स बेसिक सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे, ज्यामुळे सर्व लहान आणि मोठ्या स्क्रीनवर कंटेंट पाहिले जाऊ शकते.
हा प्लॅन Vodafone-Idea च्या मुंबई आणि गुजरात सर्कलमध्ये Rs 1,099 च्या किमतीत उपलब्ध आहे.
1,399 रुपयांचा Vi मोफत Netflix प्लॅन
दररोज 2.5GB डेटा ऑफर करणारा, हा प्लॅन 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. अशा प्रकारे रिचार्ज केल्यावर एकूण 210GB डेटा मिळतो. याशिवाय दररोज 100 एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगचा पर्यायही उपलब्ध आहे. प्लॅनमधून रिचार्ज केल्यावर नेटफ्लिक्स बेसिक सबस्क्रिप्शन दिले जात आहे आणि मोबाइलवरून स्मार्ट टीव्ही स्क्रीनवर व्हिडिओ स्ट्रीमिंग करता येते.
हा प्लॅन फ्लॅगशिप हिरो बेनिफिट्ससह येतो ज्यात डेटा डिलाईटसह अतिरिक्त बॅकअप डेटा आणि नाईट बिंजसह 12 AM ते 6 AM पर्यंत अमर्यादित डेटा ऍक्सेस समाविष्ट आहे. याशिवाय वीकेंड डेटा रोलओव्हरची सुविधाही उपलब्ध आहे.