Fact Check : बीबीसीचा ‘तो’ व्हिडीओ एक्झिट पोल नाही, जाणून घ्या काय आहे सत्य

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहा टप्प्यातील मतदान पार पडले असून सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होत आहे. ४ जून रोजी देशभरातील लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. यादरम्यान बीबीसीचा एक व्हिडीओ शेअर होत असून यात भाजपला ३४७ जागा तर काँग्रेसला ८७ जागा मिळतील, असा दावा करण्यात येत असून बीबीसाचा तो एक्झिट पोल असल्याचेही सोशल मीडियावर सांगण्यात येत आहे. यावरून सोशल मीडियावर युजर्समध्ये आरोप प्रत्यारोपही रंगले आहेत.

दरम्यान, आज तक फॅक्ट चेकमध्ये आढळून आले की व्हायरल व्हिडिओ बीबीसीच्या एक्झिट पोलचा नाही. पाच वर्षे जुन्या व्हिडिओमध्ये अँकर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल सांगत आहे. ही पोस्ट फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरही शेअर करण्यात आली आहे. तसंच एका युजरने पोस्ट एक्सवरही शेअर केली आहे.
Fact Check : मनोज तिवारी यांनी निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचं सत्य

सत्य कसे समोर आले?

व्हायरल व्हिडिओचा संपूर्ण भाग २३ मे २०१९ रोजी बीबीसी न्यूजच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर अपलोड केलेला आढळला. भारताचे निवडणूक निकाल २०१९ : मोदींचा मोठा विजय, असे या व्हिडीओचे शीर्षक होते. त्यामुळे या व्हायरल व्हिडिओचा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीशी काहीही संबंध नाही हे स्पष्ट झाले.

ही बातमी पूर्णतः पाहिल्यानंतर कळले की त्यात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल नमूद करण्यात आले आहेत. व्हायरल व्हिडिओ भाग 00:03 सुरू होतो. त्याआधी अँकर ‘आतापर्यंतचे निकाल पाहूया’ असे म्हणते. हा प्रारंभिक भाग व्हायरल व्हिडिओमधून काढून टाकण्यात आला आहे, त्यामुळे हा व्हिडिओ कोणत्या निवडणुकीच्या निकालाचा आहे हे युजर्सला कळू शकले नाही.

भाजपचा मित्रपक्ष एनडीएला ३५३ जागा मिळाल्या होत्या आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीएला ९१ जागा मिळाल्या होत्या. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यानंतर, अनेक मीडिया हाऊसेस संध्याकाळी एक्झिट पोल जारी करण्यास सुरूवात करतात.

बीबीसीच्या पाच वर्षे जुन्या वृत्ताला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठीचा एक्झिट पोल म्हणत दिशाभूल करणारा दावा केला जात आहे.

(This story was originally published by Aaj Tak, and republished by MT as part of the Shakti Collective.)



Source link

BBC News Exit Pollfact checkFact Check BBC News Videofact check newslok sabha electionlok sabha election 2024एक्झिट पोलएक्झिट पोल बीबीसी न्यूजबीबीसी न्यूज व्हिडीओ फॅक्ट चेक
Comments (0)
Add Comment