रेडमी-रियलमीची झोप उडवण्यासाठी OnePlus सज्ज; 16GB RAMसह येऊ शकतो माध्यम किंमतीचा फोन

OnePlus Nord 4 स्मार्टफोन लवकरच भारतात येऊ शकतो. हा फोन गेल्यावर्षी जुलैमध्ये लाँच झालेल्या OnePlus Nord 3 ची जागा घेईल. या फोनची माहिती लीक्सच्या माध्यमातून समोर आली आहे, ज्यामुळे फोनची किंमत आणि फीचर्स संबंधित माहिती समोर आली आहे. फीचर्स पाहता, या फोनमध्ये 6.74 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. तसेच, फोन Qualcomm Snapdragon 7+ Gen 3 प्रोसेसरसह येऊ शकतो. यात 16GB RAM व 512GB स्टोरेज देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो. फोनची बॅटरी 5500mAh ची आहे, सोबत 100W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळू शकतो.

OnePlus Nord 4 ची संभाव्य किंमत

लीक रिपोर्टनुसार, OnePlus Nord 4 फोनची किंमत OnePlus Nord 3 इतकी असू शकते. तुम्हाला माहित असेल की कंपनीनं गेल्यावर्षी जुलैमध्ये OnePlus Nord 3 फोन 33,999 रुपयांमध्ये लाँच केला होता. ही किंमत फोनच्या 8GB RAM आणि 128GB स्टोरेजची आहे. वनप्लस नॉर्ड 4 ची किंमत वनप्लस नॉर्ड 3 इतकी असू शकते, अशी चर्चा आहे. सध्या कंपनीनं फोन लाँच संबंधित कोणतीही माहिती दिली नाही.
हे देखील वाचा: सर्वात मोठी बॅटरी असलेला फोन लाँच करणार OnePlus; भारीतल्या प्रोसेसरसोबत मिळणार 16GB रॅम

OnePlus Nord 4 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

लीकनुसार, या फोनमध्ये 6.74 इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1.5K पिक्सल आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz असेल. तसेच फोन Qualcomm Snapdragon 7+ Gen 3 प्रोसेसरसह येईल. त्याचबरोबर फोनमध्ये 16GB RAM व 512GB स्टोरेज दिली जाऊ शकते.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा असेल. त्याचबरोबर 8MP चा अल्ट्रा-वाइड सेन्सर दिला जाऊ शकतो. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP फ्रंट कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. या फोनची बॅटरी 5500mAh ची असू शकते, त्याचबरोबर 100W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळू शकतो.

Source link

nord 4OnePlusoneplus nord 4 launchoneplus nord 4 launch in indiaoneplus nord 4 priceoneplus nord 4 specsवनप्लस नॉर्ड ४
Comments (0)
Add Comment