तर… लाखो भारतीयांसोबत तुमचेदेखील सिम बंद होऊ शकते, सरकारने दिला इशारा

नुकतेच सरकारने सुमारे 6 लाख मोबाईल नंबर ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. दूरसंचार विभागाने दूरसंचार कंपन्यांना एक यादी दिली असून सुमारे 6 लाख 80 हजार मोबाईल कनेक्शनची फेरतपासणी करण्यास सांगितले आहे. हे सर्व मोबाईल नंबर बनावट कागदपत्रांच्या आधारे घेण्यात आल्याचा संशय विभागाला आहे. याशिवाय हे सिम दुसऱ्याच्या नावावर असून त्याचा वापर अन्य कुणी करत असल्याचा संशयही विभागाला आहे.

अशा परिस्थितीत अनेकांची सिम अचानक बंद होत आहेत. फोनमधील नेटवर्क अचानक बंद होत आहे आणि त्यानंतर सिम कार्ड बंद होत आहे. अनेकांना सिमकार्ड बंद होण्यापूर्वी ई-व्हेरिफिकेशनचा मेसेजही येत असून तर काहींना कोणताही मेसेज न मिळता सिम बंद होत आहेत. तुमचे सिम कार्ड देखील बंद केले जाऊ शकते. अशा परिस्थितीत ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

तुमचे सिम दुसऱ्या कोणाच्या नावावर तर नाही ना?

तुम्हीही दुसऱ्याच्या नावावर असलेले सिमकार्ड वापरत असाल किंवा ते सिमकार्ड कोणाच्या नावावर आहे हे तुम्हाला माहीत नसेल, तर ते सिम कधीही बंद केले जाऊ शकते. हे टाळण्यासाठी सरकारने कोणताही ऑप्शन दिलेला नाही, परंतु आम्ही तुम्हाला तुमच्या सिम कार्डची पडताळणी किंवा केवायसी करून घेण्यास करुन घेण्याचा सल्ला देणार आहोत.

यासाठी तुम्हाला तुमच्या सिम कंपनीच्या जवळच्या स्टोअरमध्ये जाऊन आयडी प्रूफ देऊन व्हेरिफिकेशन करावे लागेल. तुमच्या नावावर सिम नसेल तर ते तुमच्या नावावर करून घ्या, अन्यथा सिम कधीही बंद होईल.

चक्षू पोर्टलवर तुम्ही तक्रार करू शकता

सरकारने ‘चक्षू’ हे आणखी एक पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर, तुम्ही फोन कॉल, एसएमएस किंवा व्हॉट्सॲपवर आलेल्या कोणत्याही संशयास्पद मेसेजेसची तक्रार करू शकता. आकडेवारीनुसार, आतापर्यंत दूरसंचार विभागाकडे 28,412 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विभागाने 10,834 कनेक्शन फेरपडताळणीसाठी पाठवले आहेत आणि 8,272 कनेक्शन, ज्यांची पडताळणी झाली नाही, ती बंद करण्यात आली आहेत.

Source link

government ordermobile numbersSIM Cardtelecom departmentदूरसंचार विभागमोबाईल नंबरसरकारसिम कार्ड
Comments (0)
Add Comment