सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिवादी क्रमांक-२द्वारे (हिमाचल प्रदेश) दिल्लीच्या प्रदेशाला उपलब्ध करून दिलेले संपूर्ण अतिरिक्त पाणी वजिराबाद बॅरेजमधून तत्काळ आणि सतत सोडण्याचे निर्देश देण्यात यावेत, असे याचिकेत म्हटले आहे.
दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही शुक्रवारी भाजपला हरयाणा आणि उत्तर प्रदेशच्या संबंधित सरकारांना दिल्लीला महिनाभर पाणी देण्यास सांगण्याची विनंती केली.
‘अतिरिक्त पाण्यासाठी केंद्राने प्रयत्न करावेत’
नवी दिल्ली : जलमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील ‘तीव्र जलसंकट’ला सामोरे जाण्यासाठी उत्तर प्रदेश किंवा हरयाणामधून अतिरिक्त पाणी सोडण्याचे निर्देश देण्याची विनंती केंद्र सरकारला केली आहे. केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांना लिहिलेल्या पत्रात आतिशी यांनी, हरयाणा यमुनेमध्ये आवश्यक प्रमाणात पाणी सोडत नसल्याने वजिराबाद बॅरेजच्या पाण्याच्या पातळीत गेल्या काही दिवसांत मोठी घट झाली आहे, असे म्हटले आहे.
‘राष्ट्रीय राजधानीत पाण्याचे मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यात दिल्लीतील तापमान जवळपास ५० अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. अत्यंत उकाड्यामुळे पाण्याची मागणी आणखी वाढली आहे. यामुळे दिल्लीतील पिण्याच्या पाणीपुरवठा साखळीवर अतिरिक्त भार पडत आहे. या टंचाईचा दिल्लीतील जलशुद्धीकरण प्रकल्पांच्या जल उत्पादन क्षमतेवर गंभीर परिणाम होत आहे’, असेही त्यांनी म्हटले आहे.