Swimming Pool Guidelines: तरणतलावांबाबत महत्त्वाचा आदेश; पाहा मुंबईत कुणाला मिळाला दिलासा…

हायलाइट्स:

  • राज्यभरात अखेर जलतरण तलाव झाले खुले.
  • मुंबईतही आदेश जशाच्या तसा लागू राहणार.
  • आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी केले स्पष्ट.

मुंबई:करोना नियंत्रणात आल्याने तसेच तिसऱ्या लाटेची शक्यता नसल्याने शाळा, कॉलेजे आणि धार्मिक स्थळांचे दरवाजे उघडण्यात आल्यानंतर आता तरणतलाव खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राज्य स्तरीय स्पर्धांत सहभागी खेळाडूंना अटी शर्तींच्या आधारे जलतरण तलाव खुले करण्यात आले आहेत. ब्रेक द चेन अंतर्गत हा आदेश जारी करण्यात आला आहे. ( Maharashtra Swimming Pool Guidelines )

वाचा: आर्यन खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; NCBची ‘ती’ विनंती कोर्टाने फेटाळली

लशीचे दोन डोस घेऊन १४ दिवस पूर्ण केलेल्या १८ वर्षांवरील खेळाडू आणि व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांना जलतरण तलावाचा वापर करण्यास, खेळाडूंना सराव करण्यास परवानगी देण्यात आली आहे. १८ वर्षांखालील खेळाडूंना त्यांच्या पालकांची संमतीपत्रे व वयाचा पुरावा म्हणून पॅनकार्ड, आधारकार्ड अथवा वयाचा उल्लेख असलेले शाळा, कॉलेजचे ओळखपत्र सादर केल्यास त्यांना जलतरण तलावात सराव करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

वाचा: VGN ज्वेलर्सच्या मालकाला अटक; ८ कोटींची फसवणूक, ‘ते’ आमिष दाखवून…

राज्य सरकारने वेळोवेळी जाहीर केल्याप्रमाणे करोनाबाबत नियमानुसार सुरक्षित अंतर, मास्कचा वापर व इतर उपाययोजना अनिवार्य राहतील. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. मुंबईबाबतची माहिती पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी परिपत्रकाद्वारे दिली असून राज्य सरकारचा निर्णय मुंबईतही पुढील आदेशापर्यंत जशाच्या तसा लागू राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

वाचा:आयकर विभागाच्या छापेमारीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

दरम्यान, राज्यातील सर्व शाळा ४ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू झाल्या आहेत. त्यापाठोपाठ आज घटस्थापनेच्या दिवशीच राज्यातील मंदिरे खुली करण्यात आली आहेत. त्यासोबतच आता ‘अनलॉक ‘ची पुढची पावले टाकायला सुरुवात करण्यात आली असून त्याचाच भाग म्हणून तरणतलाव खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोना नियंत्रणात आल्यानेच हे निर्णय घेण्यात येत आहेत. येत्या काळात लसीकरणाची टक्केवारी वाढल्यानंतर स्थिती आणखी सुधारेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

वाचा: ड्रग्ज पार्टी: मंत्री नवाब मलिक यांचा ‘तो’ आरोप एनसीबीने फेटाळला

Source link

maharashtra swimming pool guidelinesmaharashtra swimming pool latest newsmaharashtra swimming pool ordermumbai swimming pool guidelinesswimming pool guidelinesअनलॉकइक्बालसिंह चहलकरोनातरणतलाव खुलेब्रेक द चेन
Comments (0)
Add Comment