रिपोर्टनुसार, 27 मेला सनस्पॉट AR3664 मधून एक सौर वादळ निघालं आहे. हे X2.8 क्लास प्रकारचं वादळ आहे, ज्यांना सर्वात शक्तिशाली सौर वादळ म्हटलं जातं. नासानुसार, सूर्यावर खूप मोठ्या स्फोटानंतर एनर्जी, लाइट आणि हायस्पीड पार्टिकल्स अवकाशात प्रवास करत आहेत आणि पृथ्वी त्यांच्या मार्गात येत आहे.
परंतु याचा थेट परिणाम मानवीजीवनावर होणार नाही, कारण पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र सौर वादळांना रोखण्याचे काम करतं, त्यामुळे सौर वादळ वातावरण भेदून आत येत नाहीत. सौर वादळ जास्त शक्तिशाली असल्यास आपल्या इलेक्ट्रिसिटी ग्रीडवर प्रभाव टाकू शकतं. लो-अर्थ ऑर्बिट मधील सॅटेलाइट्स देखील यामुळे निकामी होऊ शकतात.
सध्या सूर्य आपले सौर चक्र पूर्ण करत आहे आणि खूप सक्रिय फेजमध्ये आहे. त्यामुळे सूर्यातून सोलर फ्लेअर्स म्हणजे ज्वाला निघत आहेत आणि त्यांचा परिणाम म्हणून पृथ्वीवर सौर वादळ येत आहेत. असे सौर वाढलं 2025 पर्यंत येत राहतील, अशी अपेक्षा आहे.
Solar Flare म्हणजे काय
जेव्हा सूर्याची चुंबकीय ऊर्जा रिलीज होते, तेव्हा त्यातून निघणारा प्रकाश आणि पार्टिकल्स द्वारे सौर फ्लेअर्स बनतात. आपल्या सूर्य मालिकेत या फ्लेअर्स आतापर्यंतचे सर्वात शक्तीशाली स्फोट आहेत, ज्यातून अब्जवधी हायड्रोजन बॉम्ब इतकी ऊर्जा रिलीज होते. इतका प्रचंड स्फोट फक्त सूर्यामुळेच आपल्या सूर्य मालिकेत होऊ शकतो.