भारतात OTT ॲप्सची क्रेझ वाढत असताना स्मार्ट टीव्हीची मागणीही वाढत आहे. स्मार्ट टीव्हीवर तुम्ही OTT ॲप्स तसेच ऑनलाइन स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकता. या कारणास्तव, बहुतेक लोक त्यांच्या घरात वायफाय कनेक्शन घेतात. तथापि, लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे स्मार्ट टीव्हीवर केवळ वाय-फायच नाही तर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनचा डेटा वापरूनही ऑनलाइन व्हिडिओ स्ट्रीम करू शकता.
फोनचे इंटरनेट टीव्हीशी कनेक्ट करणे खूप सोपे आहे. जर तुम्हाला मोबाईल इंटरनेटला टीव्हीशी कसे जोडायचे हे माहित नसेल, तर हि माहिती तुमच्या उपयोगाची आहे. मोबाईल इंटरनेटला टीव्हीशी जोडण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस येथे जाणून घ्या.
स्मार्ट टीव्हीमध्ये मोबाईल हॉटस्पॉट कसे वापरावे
1. सर्व प्रथम, आपल्या स्मार्टफोनमध्ये हॉटस्पॉट चालू करा.
2. यानंतर, तुमचा स्मार्ट टीव्ही चालू करा आणि टीव्हीच्या सेटिंग्ज ऑप्शनवर जा.
3. येथे तुम्हाला नेटवर्क सेटिंग्ज/इंटरनेट सेटिंग्ज/वाय-फाय सेटिंग्ज नावाचा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.
4. या ऑप्शनवर गेल्यानंतर, तुम्हाला तुमच्या आजूबाजूला उपलब्ध Wi-Fi नेटवर्कचे ऑप्शन दिसतील.
5. आता तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनचा हॉटस्पॉट पर्याय शोधायचा आहे. पर्याय दिसताच त्यावर क्लिक करा.
6. यानंतर तुम्हाला टीव्हीमध्ये मोबाईल हॉटस्पॉटचा पासवर्ड टाकावा लागेल.
7. हॉटस्पॉट कनेक्ट होताच, तुमच्या स्मार्टफोनमधील इंटरनेट टीव्हीवर काम करण्यास सुरवात करेल. यानंतर तुम्ही टीव्हीवर काहीही शोधू शकता आणि ते ऑनलाइन स्ट्रीम करू शकता.
स्मार्ट टीव्हीमध्ये मोबाइल डेटा वापरताना, तुमच्या नंबरवर कोणता डेटा प्लॅन ॲक्टिव्हेट आहे हे लक्षात ठेवावे लागेल. तुमच्या नंबरवर 1GB डेटा प्लॅन ॲक्टीव्ह असल्यास, टीव्हीवर कन्टेन्ट स्ट्रीम करताना तुमचे इंटरनेट लवकरच संपू शकते. अशा परिस्थितीत मोबाईल इंटरनेटला टीव्हीशी कनेक्ट करताना तुमच्या नंबरवर पुरेसा डेटा असलेला प्लॅन ॲक्टिव्ह आहे ना हे लक्षात घ्या. याशिवाय, तुम्ही कन्टेन्ट स्ट्रीमिंगसाठी डेटा पॅक देखील वापरू शकता.