Vivo Watch GT ची किंमत
Vivo Watch GT कंपनीनं सध्या चीनमध्ये सादर केलं आहे. जिथे याची किंमत 899 युआन (जवळपास 10,000 रुपये) आहे. यात एक सॉफ्ट रबर स्ट्रॅप व्हेरिएंट देखील येतो जो 799 युआन (जवळपास 9,000 रुपये) मध्ये विकत घेता येईल.
Vivo Watch GT चे स्पेसिफिकेशन्स
Vivo Watch GT मध्ये 1.85 इंचाचा डिस्प्ले आहे. हा 390 x 450 पिक्सल रिजॉल्यूशनला सपोर्ट करतो. डायल स्क्वेअर शेपमध्ये देण्यात आला आहे. याची मिडल फ्रेम मॅट अॅल्युमीनियम एलॉयची बनली आहे तर क्राउन बटन स्टीलचे आहे जे उजवीकडे मिळते. यात AI वॉचफेस फीचर कंपनीनं दिल त्यामुळे युजर व्हॉइस कमांडने वॉचफेस बनवून सेट करू शकतात.
स्मार्टवॉचमध्ये अनेक हेल्थ फीचर्स मिळतात. ज्यात हार्ट रेट मॉनिटर, SpO2 सेन्सर, स्लीप ट्रॅकर, आणि फीमेल हेल्थ सायकलचा देखील समावेश आहे. हे स्मार्टवॉच स्ट्रेस लेव्हल देखील मॉनिटर करू शकते. हे नॉइज डिटेक्शन देखील करतं. गोंधळ असलेल्या ठिकाणावरून तुम्ही शांत ठिकाणी जाऊ शकता आणि तुमच्या कानांना अराम देऊ शकता. यात 100 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत.
Vivo Watch GT का ऑपरेटिंग सिस्टम BlueOS आहे. ह्यात अनेक AI फीचर्स कंपनीनं दिले आहेत. ज्यांच्या मदतीनं तुम्ही तुमचे विचार बोलून स्मार्टवॉचमध्ये रेकॉर्ड करू शकता. यात AI Smart Window आहे जी फ्लाइट, ट्रेन, टॅक्सी, मूव्ही इत्यादी लेटेस्ट अपडेट्स तुम्हाला वाचून दाखवू शकते.
स्मार्टवॉचमध्ये 505mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा स्टॅन्डबाय मध्ये 21 दिवसांपर्यंत चालू शकतो. तर सामान्य वापर केल्यास 10 दिवस आरामात टिकू शकतो. यात कंपनीनं eSIM सपोर्ट दिला आहे. त्यामुळे कोणत्याही स्मार्टफोनविना यात कॉलिंग शक्य आहे.