जमावाने ईव्हीएम मशीन तळ्यात फेकले
मतदान केंद्रावर पोलिंग एजंट यांना प्रवेश नाकारल्यामूळे कुलटाली येथील दक्षिण २४ परगना जिल्हा येथे संतप्त जमावाने मतदान यंत्रे(EVM) आणि व्हीव्हीपॕट मशीन जप्त करुन ते तळ्यात फेकून दिल्या.
पश्चिम बंगालच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी आपल्या अधिकृत हँडलवरुन याबाबत ट्वीट करत झालेल्या घटनेची माहिती देत म्हटले आहे की,”आज सकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी बेनिमाधवपूर FP शाळेजवळ १९ जयनगर(एस सी) PC (लोकसभा मतदारसंघ) च्या १२९ कुलटाली विधानसभा मतदारसंघात सेक्टर आधिकारी यांचे राखीव ईव्हीएम व कागदपत्रे स्थानिक नागरिकांनी लुटली आहेत आणि १ कंट्रोल युनिट (CU), १ बॕलेट युनिट (BU), व दोन व्हीव्हीपँट मशीन एका तलावात फेकल्या आहेत.”
भाजप- तृणमूलचे कार्यकर्ते भिडले : पत्रकार जखमी
जाधवपूर मध्ये मतदानादरम्यान भाजप आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये झडप झाली.यामध्ये दोन्ही बाजूंनी दगडफेक करण्यात आली.या दगडफेकीमध्ये बंटी मुखर्जी हा पत्रकार गंभीर जखमी झाला असून त्याला कोलकाता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.याबाबत पश्चिम बंगाल पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून निवडणूकीच्या काळात उपद्रव घडवून आणणाऱ्यांच्या विरुद्ध सक्त कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.हिंसाचारादरम्यान काही ठिकाणी गावठी बॉम्बचाही वापर झाल्याची माहिती आहे.
पश्चिम बंगालमधील निवडणूकांच्या या अंतिम टप्प्यामध्ये बरसात,बसीरहाट,डायमंड हार्बर,दम दम,जयनगर,जाधवपूर,कोलकाता दक्षिण, कोलकाता उत्तर आणि मथुरापूर या नऊ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत आहे.अंतिम टप्प्यातील या मतदानामध्ये पश्चिम बंगालमध्ये १ जून रोजी दुपारी तीन पर्यंत ५८.४६ टक्के मतदान झाले आहे.
LoksabhaElection, EVM, Violence, Mamta Banerjee, BJP, TMC