भारतात एक्झिट पोलचा रेकॉर्ड खराब
भारतातील लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने आपल्या वृत्तापत्रात बातमी दिली आहे त्यात लिहिले आहे की, ‘भारतात निवडणूकीचा टीव्ही मीडियाने एक्झिट पोल दर्शवला आहे. त्यानुसार भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून येतील व पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. परंतु भारतात एक्झिट पोलचा रेकॉर्ड खराब आहे. अनेकदा त्यांचे निवडणूक निकाल चुकीचे असतात. असे पाकिस्तानच्या डॉन वृत्तपत्राने म्हंटलं आहे.
तीन एक्झिट पोलमध्ये एनडीए ४०० पार
एनडीए ३८५ ते ४१५ जागा जिंकणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. अन्य पक्षांना २७ ते ४५ जागा जाण्याची शक्यता आहे. इंडिया टुडेृ-एक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार एनडीए ३६१ ते ४०१, इंडिया १३१ ते १६६ आणि अन्य पक्षांच्या खात्यात ८ ते २० जागा जाणार आहेत. सी व्होटरच्या सर्वेनुसार एनडीएला ३५३ ते ३८३, इंडिया आघाडीला १५२ ते १८२ आणि अन्य पक्षांना ४ ते १२ जागा मिळण्याची शक्यता आहे. इंडिया टीव्हीच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला ४०० पार जागा दाखवल्या आहेत. यामध्ये एनडीएला ३७१ ते ४०१ जागा मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर इंडिया आघाडीला १०९ ते १३८ तसेच अन्य पक्षांना २८ ते ३८ जागा मिळण्याची शक्यता आहे.