देशबंधूंच्या एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?
DB Live (देशबंधू) वर दाखवलेल्या एक्झिट पोलनुसार देशात इंडिया आघाडीचं सरकार स्थापन होताना दिसत आहे. देशबंधूच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला २१५ ते २४५ जागा मिळताना दिसत आहेत. तर इंडिया आघाडीला २६०-२९५ जागा मिळताना दिसत आहे. २४-४८ जागा इतर खात्यात गेल्या आहेत.
महाराष्ट्रातही महायुतीला धक्का
देशबंधूच्या आकडेवारीनुसार, एनडीएला महाराष्ट्रात १८ ते २० जागा मिळू शकतात आणि इंडिया आघाडीला २८ ते ३० जागा मिळू शकतात. बिहारमध्ये एनडीएला १४ ते १७ जागा आणि इंडिया आघाडीला २४ ते २६ जागा मिळत आहेत. तर मध्य प्रदेशात एनडीएला २४-२६ , तर इंडिया आघाडीला फक्त ३ ते ५ जागा मिळत आहेत.
उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये कोण आघाडीवर?
भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचं असलेल्या उत्तर प्रदेशात यंदा कमळ फुलणार नसल्याचं या एक्झिट पोलमध्ये दिसत आहे. या एक्झिट पोलनुसार उत्तर प्रदेशमध्ये एनडीएला मोठा फटका बसत आहे. उत्तर प्रदेशात एनडीएला फक्त ४६ ते ४८ जागा मिळू शकतात. तर इंडिया आघाडीला ३२ ते ३४ जागा मिळू शकतात. पश्चिम बंगालमध्ये भाजपला ११ ते १३ जागा आणि टीएमसीला २६ ते २८५ जागा मिळू शकतात.
देशबंधूचा हा असा एकमेव एक्झिट पोल आहे ज्यामध्ये भाजप नाही तर देशात काँग्रेसची सत्ता येणार असल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे या एक्झिट पोलची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे.