Exit Poll वर पत्रकारांचा राहुल गांधींना सवाल, उत्तर आले सिद्धु मुसेवालाचं गाणं ऐकलंय का?

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक्झिट पोलचे आकडे फेटाळून लावले आहेत. सातव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर काल सायकांळी माध्यमांवर एक्झिट पोलचे आकडे येवू लागले पण ते आकडे राहुल गांधी यांनी मात्र मोदी मीडिया एक्झिट पोल असे म्हणत धुडकावून लावले आहेत. पंतप्रधान मोदींच्या यांच्या इच्छेनुसार आकडे माध्यमांनी जाहीर केलेत असे राहुल गांधींनी विधान केले आहे. एक्झिट पोलनुसार देशात पुन्हा मोदी सरकार बनेल असा तर्क लावण्यात येत आहे. भाजप आणि मित्रपक्ष मिळुन ३०० च्या वर जागा जिंकून येतील असा दावा एक्झिट पोलमध्ये केला जातोय. येत्या ४ जूनला लोकसभेचा निकाल जाहीर होणार आहे.

दिल्लीत आज पत्रकारांनी राहुल गांधी यांना इंडिया आघाडीला किती जागा मिळतील असा सवाल विचारताच राहुल गांधींनी सिद्धू मुसेवाला यांच्या गाण्याची आठवण करुन दिली राहुल म्हणाले सिद्धू मुसेवाला यांचे ‘२९५’ गाणे ऐकलंय का? असा सवाल राहुल यांनी पत्रकारांना केला. या विधानावरूनच स्पष्ट होते की राहुल गांधींना लोकसभेत इंडिया आघाडी २९५ इतका आकडा गाठेल असा विश्वास आहे.
Exit Poll NDA vs INDIA: मोदींची तपस्या फेल? एकमेव सर्व्हे ज्यात होणार ‘इंडिया आघाडी’चं सरकार, महाराष्ट्रात मविआची बाजी
सिद्धू मुसेवाला कोण आहे?
पंजाबमधील प्रसिद्ध गायक म्हणून सिद्धू मुसेवाला यांची ओळख आहे. २०२१ साली सिद्धू मुसेवाला काँग्रेस पक्षात सामील झाला होता. पंजाबी भाषेत सिद्धू मुसेवाला यांनी अनेक गाणी गायली आहेत. तसेच काही वादग्रस्त गाण्यांसाठी मुसेवाला चर्चेत सुद्धा होता. २९ मे २०२२ साली मुसेवाला यांची हत्या करण्यात आली, लॉरेन्स बिश्नोई गॅगने सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या केली असे तपासात उघड झाले. पण रॅप सॉंग आणि पंजाबी गाण्यामुळे तरुणाईच्या मनात आजही त्याची क्रेझ आहे.
सिद्धू मुसेवालांनी २०२१ साली काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.

शनिवारी संध्याकाळी एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत आकड्यांनुसार मोदी सरकार विजयाची हट्रिक करणार अशीच चिन्हे दिसत आहे. २०१९ च्या लोकसभा निकालाप्रमाणेच यंदाही जवळजवळ ३५० जागांवर भाजपा जिंकून येईल असे एक्झिट पोलच्या निकालातून दिसते.पूर्व आणि दक्षिणेतील राज्यांमध्ये भाजप खाते उघडेल आणि बंगाल, ओडिशामध्ये जास्त जागांवर भाजप बाजी मारेल अशी सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली आहे. याउलट इंडिया आघाडीला साधारण १५० ते १८० जागांवर विजय मिळू शकतो असा आकडा एक्झिट पोलनुसार दाखवला जातोय.

Source link

Congresscongress on exit pollexit pollindia allianceRahul Gandhiइंडिया आघाडीएक्झिट पोलराहुल गांधी
Comments (0)
Add Comment