ड्रग्ज पार्टीत भाजप नेत्याचा मेहुणा; तो नेता कोण? नवाब मलिक म्हणाले…

मुंबई: क्रूझवरील ड्रग्ज पार्टीच्या (Mumbai Drug Party) संदर्भात दिवसागणिक धक्कादायक माहिती पुढं येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आणखी एक स्फोटक दावा केला आहे. ‘क्रूझवरील ड्रग पार्टीत भाजपच्या एका बड्या नेत्याचा मेहुणा होता. मात्र, त्याला सोडण्यात आलं,’ असा दावा मलिक यांनी केला आहे. उद्या याचे व्हिडिओ पुरावेच सादर करणार आहे, असं मलिक यांनी आज सांगितलं. (BJP Connection with Drug Party)

आर्यन खान (Aryan Khan) याला झालेली अटक बोगस असल्याचा संशय पहिल्या दिवशी व्यक्त करणारे नवाब मलिक या संदर्भात रोज नवनवे गौप्यस्फोट करत आहे. त्यांनी आज दिलेल्या माहितीनुसार, क्रूझ पार्टीवरील कारवाईत एनसीबीनं एकूण १० लोकांना पकडलं होतं. त्यापैकी २ लोकांना सोडलं. या दोघांमध्ये एक भाजप नेत्याचा मेहुणा होता. त्या दोन लोकांना NCB कार्यालयात आणण्यात आलं होतं. मात्र, काही तासांनी त्यांना सोडण्यात आलं. हे जाणीवपूर्वक करण्यात आलं आहे. सगळा प्रकार समोर येईल म्हणून त्यांना सोडण्यात आलं का, असा सवाल त्यांनी केला.

वाचा: भाजपनं राष्ट्रीय कार्यकारिणीतून नारायण राणेंना का डावलले?

‘भाजपचा हा नेता कोण आहे, त्याचं नाव उद्या घोषित करणार आहे. भाजपचा तो हायप्रोफाईल नेता असून त्यानंच सगळं गॉसिप केलं आहे. पॉलिटिकल कनेक्शन असणारा माणूस सुटलाच कसा? NCB ला याचं उत्तर द्यावंच लागेल, असं मलिक म्हणाले. NCB चे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी मीडियाला बाइट देताना ८ ते १० लोकांना पकडलं आहे, असं सांगितलं होतं. संपूर्ण कारवाई करणारा एक अधिकारी अशी अंदाजे माहिती कशी देऊ शकतो, असा सवाल त्यांनी पुन्हा एकदा केला.

वाचा: लॉकडाउन हाल संपेनात! रस्ते बंद असल्याने रुग्णाला खांद्यावर नेण्याची वेळ

‘परमबीरसिंग देखील जनतेचा सेवक होता. शर्मा सुद्धा जनतेचे सेवक होते, परंतु देशसेवा न करता हे दुसरे धंदे करत होते. हा व्यक्ती देखील त्यातील आहे. हळूहळू याचा सगळा खुलासा करणार आहे. कलाकारांकडून यांनी पैसे घेतले आहेत. दोन ग्रॅम, चार ग्रॅमसाठी पैसे घेतले. त्यांच्यापेक्षा आमच्या राज्य सरकारच्या नार्कोटिक्स विभागानं काल दिवसभरात मोठ्या कारवाया केल्या. त्यात २० किलो ड्रग्ज पकडले आहेत. त्यांची कामं आमचा विभाग करतो आहे. जसजसे पुरावे हातात लागतील, तसतशी यांची पोलखोल करणार आहे, असा इशारा मलिक यांनी दिला.

वाचा: आजपासून ‘मिशन कवच कुंडल’; जाणून घ्या काय आहे ठाकरे सरकारचे लक्ष्य?

Source link

Aryan Khan Drug Party CaseBJP Connection With Mumbai Drug PartyNawab MalikNawab Malik on Mumbai Drug Partyनवाब मलिकमुंबई ड्रग्ज पार्टी प्रकरण
Comments (0)
Add Comment