मुलाला मिठी, आई वडिलांचे चरणस्पर्श, भावुक वातावरणात अरविंद केजरीवाल तिहार जेलमध्ये

मंगेश वैशंपायन, नवी दिल्ली : दिल्लीतील कथित दारु घोटाळ्यात २१ दिवसांच्या अंतरीम जामीनावर बाहेर आलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी दुपारनंतर तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केले. त्याआधी त्यांनी कॅनॉट प्लेस येथील प्राचीन हनुमान मंदिरात जाऊन पूजाअर्चा केली. तदनंतर आम आदमी पक्षाच्या (आप) कार्यालयात कार्यकर्त्यांना सांगितले की ‘देशाला वाचवण्यासाठी मी तुरुंगात जात आहे. मी परत कधी येईन माहीत नाही. तिथे माझे काय होईल हे मला माहीत नाही.’

केजरीवालांच्या अंतरिम जामिनाची मुदत शनिवारी (१ जून) संपली. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना १० मे रोजी निवडणूक प्रचारासाठी अंतरिम जामीन मंजूर केला होता. जामीन मंजूर केल्याबद्दल केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयाचेही आभार मानले.
अरविंद केजरीवालांनी सांगितला स्वतःचा एक्झिट पोल, इंडिया अलायन्सला किती जागा मिळतील?

केजरीवाल म्हणाले की, सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे सर्व एक्झिट पोल बनावट व खोटे आहेत हे माझ्याकडून लिहून घ्या. या एक्झिट पोलननुसार राजस्थानमध्ये भाजपला ३३ जागा दिल्या असल्या तरी तिथे त्यांना फक्त २५ जागा मिळणार आहेत. एक्झिट पोल करणारांवर दबाव आला असावा. त्यांना असे खोटे का सांगावे लागले हे माहिती नाही. भगतसिंग यांच्याशी स्वतःची तुलना करताना केजरीवाल म्हणाले की भगतसिंग देशासाठी फासावर गेले. मीदेखील देशासाठी हुतात्मा होण्यास तयार आहे. आप कार्यकर्त्यांना तुरुंगाचे भय वाटत नाही.
अरविंद केजरीवाल यांना रविवारी पुन्हा तिहार तुरुंगाच्या गजाआड जावे लागणार!

आईवडिलांना नमस्कार करून घरातून निघालेले केजरीवाल दुपारी साडेतीन वाजता सर्वप्रथम राजघाटावर पोहोचले. येथे त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या समाधीवर आदरांजली वाहिली व काही काळ मौन बाळगले. यानंतर केजरीवाल यांनी येथील हनुमान मंदिरात पूजा केली व ते आम आदमी पार्टीच्या कार्यालयात पोहोचले. तेथून ते तिहार कारागृहात गेले व त्यांनी तुरुंग अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केले.
प्रचार करताना प्रकृतीने साथ दिली ना…? ईडीचा उपरोधिक सवाल, केजरीवालांच्या जामिनाला कडाडून विरोध

ते म्हणाले की, या २१ दिवसांच्या जामीन काळात मी एक मिनिटही वाया घालवला नाही. मी फक्त प्रचार केला. आमच्यासाठी केवळ आप नव्हे तर देश महत्त्वाचा आहे. मला दिल्लीतील लोकांना सांगायचे आहे की, मी घोटाळा केला आहे. मी पुन्हा तुरुंगात जात आहे कारण मी हुकूमशाही विरोधात आवाज उठवण्याचा घोटाळा केला आहे.
Parbhani Exit Poll : एक्झिट पोलचे सगळे सर्वे माझ्या बाजूने, १०० कोटी खर्चूनही जानकारांना फायदा नाही, संजय जाधवांनी डिवचले

पंतप्रधान नरेंद्र मोदी एका मुलाखतीत म्हणाले की, केजरीवाल यांच्या विरोधात कोणताही पुरावा शिल्लक नाही. कारण ते अनुभवी चोर आहेत. तुमच्याकडे माझ्याविरुद्ध कोणताही पुरावा किंवा कोणतीही पैशाची वसुली नाही म्हणून तुम्ही मला कोणत्याही पुराव्याशिवाय तुरुंगात टाकले का? मी याच हुकूमशाहीविरुद्ध लढत आहे आणि आपला देश या प्रकारची हुकूमशाही सहन करू शकत नाही.

Source link

arvind kejriwalArvind Kejriwal interim bailarvind kejriwal newsArvind Kejriwal Surrender At Tihar JailArvind Kejriwal Tihar jailअरविंद केजरीवालअरविंद केजरीवाल तिहार जेल
Comments (0)
Add Comment