IP69 रेटिंग असलेला पहिला फोन
IP69 रेटिंग ही वॉटर आणि डस्ट प्रोटेक्शन देणारी सर्वात हाय रेटिंग आहे. विशेष म्हणजे Samsung Galaxy S24 आणि iPhone 15 सीरिजच्या महागड्या हॅंडसेट्स मध्ये देखील ही रेटिंग मिळत नाही. या फोन्समध्ये IP68 रेटिंग मिळते. लीकनुसार, कंपनी F27 Pro स्मार्टफोनमध्ये 3D कर्व्ड AMOLED डिस्प्ले देणार आहे. डिस्प्ले साइज आणि रिफ्रेश रेटची माहिती मात्र मिळाली नाही.
टिपस्टरने X वर शेयर केलेल्या पोस्टनुसार, फोनमध्ये कॉसमॉस रिंग डिजाइनसह लेदर बॅक मिळेल. बॅक पॅनलवर देण्यात असलेली ब्लू कलर स्ट्रिप उठून दिसते. यातील कॅमेरा मॉड्यूलमध्ये देखील तुम्हाला ब्लू मेटल रिंग मिळेल. त्यामुळे ओप्पोचा आगामी डिवाइस खूप युनिक बनतो. फोनच्या सविस्तर माहितीसाठी अजून काही काळ वाट पाहावी लागेल.
Oppo F25 Pro चे फीचर आणि स्पेसिफिकेशन
कंपनी या फोनमध्ये 6.7 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देत आहे. हा AMOLED डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. याची पीक ब्राइटनेस लेव्हल 1110 निट्स आहे. फोन 8जीबी रॅम आणि 256जीबी इंटरनल स्टोरेजसह आला आहे. प्रोसेसर म्हणून डायमेन्सिटी 7050 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये तुम्हाला एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरा मिळतील. यात 64 मेगापिक्सलच्या मेन कॅमेऱ्यासह एक 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल आणि एक 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर देखील असेल. तसेच, सेल्फीसाठी कंपनी या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे. फोनची बॅटरी 5000mAh ची आहे, जो 67 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.