Accident: वऱ्हाड निघालं, पण मांडवात पोहोचण्यापूर्वीच अनर्थ घडला, ट्रॅक्टर पलटी होऊन १३ जणांचा मृत्यू

भोपाळ : मध्यप्रदेशच्या राजगढ येथे मोठा अपघात घडला आहे. लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी झाला आहे. या अपघातात १३ लोकांचा दुर्दैवी अंत झाला आहे, ज्यामध्ये ४ लहान मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर १५ जखमी असल्याची माहिती समोर येत आहे.

राजगढच्या पीपलोदी येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. रात्री ८च्या सुमारास राजस्थाहून कुलामपूरला लग्नाचं वऱ्हाड घेऊन निघालेला ट्रॅक्टर पलटी झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, यात १३ लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मृतांना शवविच्छेदनासाठी तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले आहे. यातच जखमी झालेल्या १५ जणांपैकी २ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे देखील पोलिसांनी सांगितले आहे.
Fact Check: उत्तराखंडच्या चारधाम यात्रेत ट्रॅफिक जाम? फोटो व्हायरल, जाणून घ्या यामागचे सत्य
राजगढच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दुर्घटनेबद्दल एएनआय वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे. ते म्हणाले, ‘काही जण राजस्थानहून ट्रक्टरमधून राज्यात लग्नासाठी येत होते. तेव्हा राजस्थान-राजगढ सीमेच्या नजीक हा ट्रॅक्टर पलटी झाला. ज्यामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी आहेत. जखमींमधील २ जणांची स्थिती चिंताजनक आहे, ज्यांना आम्ही पुढील उपचारासाठी भोपालच्या रुग्णालयात नेण्याचे सुचवले आहे. तर जखमींना शासना दिलेल्या सूचनेप्रमाणे योग्य उपचार दिले जात आहेत.’
Sansad Bhavan : संसद सुरक्षा यंत्रणेत विचित्र अस्वस्थता, PSS कर्मचाऱ्यांना नोकरीची चिंता
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत सांगितले की, राजगढचे जिल्हाधिकारी हर्ष दीक्षित, पोलिस अधीक्षक आणि मंत्री नारायण सिंह पनवार घटनास्थळी उपस्थित आहेत. आम्ही राजस्थान सरकार आणि पोलिसांच्या संपर्कात आहोत. जखमींना राजगड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही गंभीर जखमींना उपचारासाठी भोपाळला नेण्यात आले
आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आणि सांगितले की, मध्य प्रदेशातील राजगढ येथे रस्ते अपघातात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. या घटनेत ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. घटनेतील जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करते.

Source link

madhyapradesh newsmadhyaradesh policeMohan Yadavrajgarhterrible accidenttractor overturnedअपघाताचे बळीमध्यप्रदेशात भीषण अपघातराजगढलग्नाचं वऱ्हाडावर दु:ख
Comments (0)
Add Comment