Pradosh Vrat : प्रदोष शिवरात्री शुभ संयोग! शंकराची अशी करा पूजा, अनेक इच्छा होतील पूर्ण

भौम प्रदोष २०२४ :

जून महिन्यात अनेक ग्रहांचे संक्रमण होत आहे. त्याचबरोबर काही शुभ संयोगही जुळून आले आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार पाच ग्रह एका राशीत आल्यामुळे पंचग्रह संयोगही तयार झाला आहे.

जून महिन्याच्या सुरुवातीला प्रदोष आणि शिवरात्री एकाच दिवशी आल्याने शुभ संयोग तयार होत आहे. प्रदोष आणि शिवरात्रीचा संयोग महादेवाला समर्पित करण्यात आला आहे. या दिवशी शंकराची पूजा केल्याने आपल्याला शुभ फल प्राप्त होते. या काळात शंकराला अधिक महत्त्व असते.

४ जून ला प्रदोष व्रत आणि मासिक शिवरात्रीचा शुभ संयोग जुळून आला आहे. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ आहे. या दिवशी व्रत केल्याने आणि शंकराची मनोभावे पूजा केल्याने इच्छित परिणाम मिळतात. तसेच शंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुभ मुहूर्तावर भोलेनाथाची पूजा करा

1. प्रदोष व्रत २०२४

हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्याची त्रयोदशी तिथी ३ जून च्या मध्यरात्री १२ वाजून १९ मिनिटांनी सुरु होईल. तर ४ जूनला रात्री १० वाजून १ मिनिटांनी संपेल. हा प्रदोष व्रत भौम प्रदोष म्हणून ओळखला जाईल. प्रदोष व्रत जर सोमवारी आले तर त्याला सोमप्रदोष म्हणून ओळखले जाते. मंगळवारी आला तर त्याला भौम प्रदोष म्हणून ओळखले जाते. भौम प्रदोषाच्या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीची मनोभावे पूजा करा. प्रदोष व्रताच्या पूजेची वेळ सायंकाळी ७ ते ८ वाजता शुभ मानली जाते.

2. शिवपूजन कसे कराल?

  • प्रदोष व्रतामध्ये शंकराची पूजा ही संध्याकाळी केली जाते.
  • महादेवाची पूजा झाल्यानंतर ऊँ नम शिवाय: मंत्राचा जप केल्याने शुभफले मिळतात.
  • या दिवशी शंकराचे दर्शन घेतल्याने अनेक अपूर्ण इच्छा पूर्ण होतात. तसेच रखडलेली कामे मार्गी लागतात.
  • शिवपिंडीवर रुद्राभिषेक किंवा जलभिषेक करावा. या दिवशी शंकराच्या पिंडीवर बेलपत्र आणि फुले अर्पण करा. धुप, दीप आणि नैवेद्य दाखवून आरती करा.
  • महादेवाचे नामस्मरण, शिवचरित्राचे पठण करा

टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.

Source link

lord shivaMasik Shivratri 2024Pradosh Vrat 2024Shiv Pujaप्रदोष व्रतभौम प्रदोषमासिक शिवरात्री
Comments (0)
Add Comment