रिटेल बॉक्सवरून झाला खुलासा; 32 मेगापिक्सलचे दोन सेल्फी कॅमेरे मिळतील ‘या’ फोनमध्ये

Xiaomi 14 Civi भारतीय लाँचसाठी सज्ज आहे. फोन देशात 12 जूनला लाँच होणार आहे. हा फोन Xiaomi Civi 4 Pro चा रिब्रँडेड व्हर्जन असेल, अशी चर्चा आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, फोनमध्ये 6.55 इंचाचा 1.5K डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 120Hz रिफ्रेश रेट आहे. डिव्हाइसमध्ये Qualcomm Snapdragon 8s Gen 3 चिपसेट आहे. आता लाँच पूर्वीच याच्या रिटेल बॉक्सचे फोटोज लीक झाले आहेत, त्यामुळे फोनच्या मेन स्पेसिफिकेशन लीक झाले आहेत.

Xiaomi 14 Civi च्या रिटेल बॉक्सचे फोटोज लीक झाले आहेत. टिपस्टर अभिषेक यादवनं हा रिटेल बॉक्स आपल्या सोशल मीडिया हँडल X च्या एका पोस्टमध्ये दाखवला आहे. बॉक्सवरील माहितीनुसार, फोनमध्ये Leica ब्रँडचा 50 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा सेन्सर असेल. यात 32 मेगापिक्सलचा ड्युअल सेल्फी कॅमेरा असेल. यात AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे जो 1.5K रिजॉल्यूशनला सपोर्ट करतो.

डिस्प्लेमध्ये 120Hz रिफ्रेश रेटचा सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये Snapdragon 8s Gen 3 चिपसेटची प्रोसेसिंग पावर मिळेल. फोनची बॅटरी कैपिसिटी 4700mAh ची आहे. याचे कलर ऑप्शन देखील समोर आले आहेत. फोन Cruise Blue, Matcha Green, आणि Shadow Black मध्ये येईल.
ड्युअल सेल्फी कॅमेरा असलेले Xiaomi चा फोन पुढील महिन्यात येणार भारतात

फोन Xiaomi Civi 4 Pro चा रिब्रँडेड व्हर्जन असेल. इतर स्पेसिफिकेशन्स पाहता, यात 50 मेगापिक्सलचा वाइड कॅमेरा, 12 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा, आणि 50 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप मिळणार आहे. या फोनमध्ये 4,700mAh बॅटरीसह 67W फास्ट चार्जिंग देखील मिळेल. फोनची किंमत 50 हजार रुपयांच्या आसपास असू शकते. डिव्हाइसमध्ये Qualcomm Snapdragon 8s Gen 3 चिपसेट आहे. ज्यामुळे हा एक दमदार डिवाइस ठरू शकतो. हा कंपनीचा Civi सीरिजचा पहिला फोन आहे जो भारतात लाँच होत आहे, ही सेल्फी कॅमेरा सेंट्रिक सीरिज कशी परफॉर्म करते ते पाहावं लागेल.

Source link

Xiaomi 14 Civixiaomi 14 civi india launchxiaomi 14 civi launchxiaomi 14 civi launch date in indiaxiaomi 14 civi retail box leakedxiaomi 14 civi specifications
Comments (0)
Add Comment