Diamond Gemstone : हिऱ्याची अंगठी कुणी घालावी? ज्योतिषशास्त्र काय सांगते? जाणून घ्या

Diamond koni Ghalu Naye :

नवरत्नांपैकी हिरा हा सर्व रत्नांचा राजा मानला जातो. हल्लीच्या फॅशन ट्रेंडनुसार खरा आणि खोटा हिरा आपल्याला अनेकांकडे पाहायला मिळतात. हिऱ्याच्या अंगठीशिवाय हिऱ्याचे कानातले, गळ्यातल असे त्याचे विविध प्रकार आपण पाहातो.

हिऱ्याची ओपल, जरकन, नीलमणी आणि कुरंगी ही त्याचे रत्न आहेत. हिरा हा सुंदर आणि महाग रत्न असून ते प्रभावशाली आहे. रत्न शास्त्रामध्ये हिऱ्याला नऊ रत्नांपैकी एक मानले जाते.

ज्योतिषशास्त्रानुसार हिऱ्याचे दागिने घालणे फायद्याचे आणि तोट्याचे आहे. हिरा परिधान करणे हा शुक्र ग्रहापासून लाभ मिळवण्याचे कारक मानला जातो. हिरा परिधान केल्याने सौंदर्य, आकर्षण, प्रसिद्धी आणि लोकप्रियता वाढते. हिरा घातल्याने काही नकारात्मक परिणाम देखील आपल्याला पाहायला मिळतात. जाणून घेऊया हिऱ्याचे दागिने कोणत्या लोकांनी घालावे.

1. कोणत्या राशीसाठी हिरा शुभ आणि अशुभ आहे?

ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ, मिथुन, कन्या, तुळ, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी हिरा धारण करण्याचे शुभ परिणाम मिळतात. तर मेष, सिंह, वृश्चिक, धनु आणि मीन लोकांसाठी हिरा अशुभ मानला जातो. कर्क राशीचे लोक काही विशिष्ट काळात हिरा घालू शकतात. कोणतेही रत्न घालताना ज्योतिषशास्त्राचा सल्ला घ्यावा. ज्या लोकांना आध्यात्मिक प्रगती करायची आहे त्यांनी चुकूनही हिरा घालू नका. ज्यांना ग्लॅमर, चित्रपट किंवा माध्यम क्षेत्रात नाव उंचवायचे आहे त्यांना हिरा घालणे फायदेशीर आहे.

2. हिरा घालण्याची योग्य पद्धत

कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील शुक्रवारी हिरा घालण्यासाठी शुभ असतो. याशिवाय अश्विन महिन्यातील नवरात्रीमध्ये शुक्रवारी विधीनुसार हिरा धारण करणे अतिशय शुभ मानले जाते. हिरा धारण करण्याआधी शुक्र देवाची पूजा करा. हिऱ्याची अंगठी परिधान करण्यापूर्वी कच्च्या दुधाने आणि गंगाजलाने अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर उजव्या हाताच्या तर्जनीमध्ये हिरा धारण करावा. यामुळे करिअर आणि व्यवसायात यश मिळते तसेच संपत्तीत देखील वाढ होते.

3. हिरा कोणत्या व्यक्तींने परिधान करावा?

  • कला क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या लोकांना हिरा परिधान करणे शुभ मानले जाते. यामध्ये चित्रपट, संगीत आणि चित्रकला यामध्ये काम करणारे.
  • वैवाहिक जीवनातील गोडवा आणि आनंद टिकवून ठेवण्यासाठी हिरा घालणे शुभ ठरते.
  • कमकुवत शुक्र, करिअर मार्गातील अडथळे येत असतील तर हिरा परिधान केल्याने अनेक अडचणींपासून सुटका होते.

टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.

Source link

Astrology TipsDiamond GemstoneDiamond Gemstone benefitsDiamond Gemstone side effectswho to wear diamondज्योतिषशास्त्रहिरा कोणी परिधान करावा?
Comments (0)
Add Comment