अजितदादांच्या राष्ट्रवादीचं मोठं यश, राज्याबाहेर झेंडा रोवला; पुन्हा मिळवणार ‘तो’ दर्जा?

नवी दिल्ली: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत ३ जागा जिंकल्या आहेत. राज्यात भारतीय जनता पक्षानं सत्ता राखली आहे. भाजपनं ६० पैकी ४६ जागा जिंकल्या आहेत. राज्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं ३ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे दादांच्या राष्ट्रवादीनं राष्ट्रीय पक्ष होण्याच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकलं आहे.

अरुणाचल प्रदेशमध्ये आम्ही विधानसभेच्या ३ जागा जिंकल्या. राज्यात आम्हाला १० टक्क्यांपेक्षा अधिक मतं मिळाली आहेत. या यशामुळे आम्ही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा पुन्हा मिळवण्याच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे टाकलं आहे. आणखी एका राज्यात चांगली कामगिरी केल्यास आम्ही पुन्हा एकदा राष्ट्रीय पक्ष होऊ, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी सांगितलं.
बेड परफॉर्मन्समुळे कापला १६ शिक्षकांचा पगार, शिक्षण विभागात धक्कादायक प्रकार; प्रकरण काय?
२००० साली राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला. पण एप्रिल २०२३ मध्ये पक्षानं राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावला. २०२३ मध्ये पक्षानं गोवा, मणीपूर, मेघालयात राज्य पक्षाचा दर्जा गमावला. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी पक्षाला किमान चार राज्यांमध्ये राज्य पक्षाचा दर्जा असावा लागतो. त्यासाठी त्यांना विधानसभा निवडणुकीत किमान दोन जागा किंवा सहा टक्के मतं मिळावावी लागतात.
तरुणाला असह्य वेदना; पोटातून निघाले १० खिळे, १ किल्ली, नट बोल्ट अन् ८ सुया; डॉक्टर चकित
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांच्या गटाला मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दर्जा मिळवला. नागालँडमध्ये राष्ट्रवादीचे सहा आमदार आहेत. आता अरुणाचल प्रदेशात पक्षाचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. राज्यात पक्षाला एकूण ६३ हजार ६३० मतं मिळाली. राष्ट्रवादीनं १४ जागांवर निवडणूक लढवली होती. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला अरुणाचल प्रदेशात एकही जागा मिळाली नव्हती.

Source link

ajit pawararunachal pradeshncpअजित पवारअरुणाचल प्रदेशराष्ट्रवादी काँग्रेस
Comments (0)
Add Comment