Vastu Tips For Kitchen
स्वयंपाकघर देवघरा इतकच पूजनीय मानले जाते. माणासाच्या जिभेचे चोचले पूरवणाऱ्या स्वयंपाकघराचे वास्तूशास्त्रात अनेक नियम सांगितले आहे.
वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गोष्टीचे शुभ आणि अशुभ परिणाम आपल्याला मिळतात. असे म्हटले जाते की, वास्तुच्या काही नियमांचे पालन केले तर आपल्याला शुभ फले प्राप्त होतात.
वास्तुनुसार स्वंयपाकघराची दिशा योग्य असायला हवी. तसेच स्वयंपाकघरात कोणत्याही वस्तू ठेवू नये त्यामुळे लक्ष्मी देवी नाराज होतात. वास्तुशास्त्रात स्वयंपाकघरातील कोणत्या ५ गोष्टी कधीही संपू देऊ नये, त्यामुळे लक्ष्मी देवी नाराज होऊन घरावर आर्थिक संकट येते. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर
1. तांदूळ
प्रत्येक धार्मिक कार्यात तांदळाचा वापर केला जातो. कपाळाला टिळा लावल्यानंतर तांदूळ अक्षता म्हणून लावले जाते. लग्न कार्यात देखील तांदळाला अधिक महत्त्व दिले आहे. वास्तुशास्त्रात तांदळाचा संबंध हा चंद्र आणि शुक्राशी येतो. तांदूळ या ग्रहांना मजबूत करु शकतो. तांदूळ हे शुद्धतेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे घरातील स्वयंपाकघरात तांदळाचे भांडे रिकामी भाडे ठेवू नका. असे केल्याने तुम्ही लक्ष्मीच्या आशीर्वादापासून वंचित राहू शकता.
2. पीठ
वास्तुशास्त्रानुसार घराच्या स्वंयपाकघरात पिठाची कमतरता भासू नये. पीठ संपण्याआधी घरी ते भरुन ठेवायला आहे. पीठाचा रिकामा डबा तुमच्या कौटुंबिक जीवनातील कलहाचे कारण बनू शकते.
3. मीठ
जर तुमच्या स्वयंपाकघरात मीठ नसेल तर तुमच्या आयुष्यात अनेक समस्या येऊ शकतात. वास्तुशास्त्रात मीठ घरातील नकारात्मकता दूर करते. त्यामुळे स्वयंपाकघरातील मिठाचे भांडे रिकामे असल्यास ते भरावे. तुमच्या घरातील अनेक वास्तूदोष दूर करण्यासाठी मीठ प्रभावी ठरते.
4. हळदी
स्वयंपाकघरात हळदीची कमतरता कधीही नसावी. हळदीचा संबंध ज्योतिशास्त्रात गुरु ग्रहाशी सांगितला आहे. स्वंयपाकघरातील हळदीचे भांडे कधीही रिकामी ठेवू नये. हळदीच्या कमतरतेमुळे तुमच्या घरात समस्या निर्माण होऊ शकतात. घरात हळद ठेवल्याने कौटुंबिक जीवनात संतुलन राखले जाते.
5. लवंगा
घरात लवंग ठेवल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख-समृद्धी येते. लवंगाचे भांडे रिकामे ठेवल्याने आर्थिक चणचण भासू लागते.
टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.