Mangalwar che Upay : मंगळवारी करा हे ५ उपाय, नोकरीतील अडचणी होतील दूर

Tuesday Astrology :

मंगळवारचा दिवस हनुमानला समर्पित आहे. या दिवशी हनुमानाची विधीपूर्वक पूजा केल्याने अनेक अडचणींवर मात करता येते. तसेच हनुमानाचे व्रत केल्याने शुभ फले प्राप्त होतात. ज्योतिषशास्त्रात मंगळवारी काही विशिष्ट उपाय केल्याने अपेक्षित फल मिळते.

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक दिवसांचा राशी स्वामी वेगळा असतो. त्यानुसार त्या दिवशी देवतांना पूजले जाते. अशातच मंगळवार हा दिवस रामभक्त हनुमानाला समर्पित करण्यात आला आहे.

पौराणिक मान्यतेनुसार हनुमानाचा जन्म मंगळवारी झाला होता. त्यामुळे या दिवशी हनुमानाचे मनोभावे व्रत करायला हवे. या दिवशी उपवास केल्याने जीवनातील सर्व प्रकारचे संकटे दूर होतात. मंगळ हा ग्रह हनुमानाशी संबंधित मानला जातो.

मंगळवारी करा हे उपाय

1. सरकारी नोकरी मिळण्याची इच्छा असेल तर मंगळवारी हनुमानाची पूजा करावी. तसेच पूजा करताना पान अर्पण करावे. हा उपाय केल्याने हनुमानजी प्रसन्न होतात. त्यांच्या कृपेने व्यक्तीला अपेक्षित यश मिळते. याशिवाय सरकारी नोकरी देखील मिळते.

2. ज्योतिषशास्त्रांच्या मते कुंडलीच्या पहिल्या, दुसऱ्या, चौथ्या, सातव्या, आठव्या आणि बाराव्या घरात मंगळ असेल तर त्या व्यक्तीला मांगलिक दोष असतो असे म्हटले जाते. अनेक वेळा हा दोष दूर देखील करता येतो. मंगळदोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी मंगळवारी लाल मिरचीचे दान करावे.

3. हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी राम चरित्रमानससह हनुमान चालीसाचे पठण करावे. या स्तोत्राचे पठण केल्याने नकारात्मक गोष्टी दूर होतात. घरात पैसा टिकून राहातो.

4.जर तुमच्या कोणत्याही इच्छा पूर्ण करायच्या असतील तर मंगळवारी स्नान करुन ध्यान करा. तसेच लाल वस्त्र परिधान करा. यानंतर विधीनुसार हनुमानाची पूजा करा. यावेळी हनुमानाला लाल रंगाची फळे, शेंदूर आणि फुले अर्पण करा. कपाळावर शेंदूरचा तिलक लावा.

5. वास्तुशास्त्रानुसार मंगळवारी कोणालाही पैसे उधार देऊ नका आणि घेऊही नका. यामुळे आर्थिक स्थिती खराब होते.

टीप :
ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.

Source link

astro newsJob solutionLord HanumanMangalwar che UpayTuesday AstrologyTuesday remediesमंगळवारचे उपायहनुमानाची पूजा
Comments (0)
Add Comment