Jioचा कोणता प्लॅन देईल हे बेनिफिट्स?
Jio कंपनीच्या 222 रुपयांच्या डेटा बूस्टर प्लानबद्दल आपण येथे जाणून घेणार आहोत. या प्लॅनसह कंपनी आपल्या प्रीपेड युजर्सना अतिरिक्त 50GB डेटा ऑफर करते. म्हणजेच 1GB डेटासाठी तुम्हाला 5 रुपये देखील खर्च करावे लागणार नाहीत.
डेटा बूस्टर प्लॅन म्हणजे काय?
डेटा बूस्टर प्लॅन सामान्य रिचार्ज प्लॅनपेक्षा वेगळा आहे. असे प्लॅन्स यूजरच्या अतिरिक्त डेटाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ऑफर केल्या जातात. हा पॅक फक्त आधीपासून ऍक्टीव्ह असलेल्या रिचार्ज प्लॅनसह वापरला जाऊ शकतो. डेटा बूस्टर प्लॅनची स्वतःची कोणतीही स्वतंत्र व्हॅलिडिटी नाही.
या प्लॅनची व्हॅलिडिटी आधीपासून ऍक्टीव्ह असलेल्या रिचार्ज प्लॅनवर आधारित आहे. उदाहरणार्थ, जर तुमच्या फोनचा 28 दिवसांचा रिचार्ज प्लान असेल, तर या प्लॅनसोबतच तुम्ही बूस्टर प्लॅन घेतला असेल तर दोन्हीही प्लॅन्सची व्हॅलिडिटी सोबत समाप्त होईल.
डेटा बूस्टर प्लॅन कोणत्या प्लॅनसह खरेदी करावा
90 दिवस किंवा 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह बेस रिचार्ज प्लॅनसह हा प्लॅन उपयुक्त ठरू शकतो. अशा प्लॅनसह, दीर्घ व्हॅलिडिटीसह 50GB अतिरिक्त डेटा वापरला जाऊ शकतो.
सध्याच्या प्लॅनची व्हॅलिडिटी संपल्यानंतर, डेटा बूस्टर प्लॅन देखील समाप्त होईल. चांगली गोष्ट अशी आहे की डेटा बूस्टर प्लॅन दररोजच्या वेगवेगळ्या डेटा गरजांसाठी उपयुक्त ठरणार आहे. जर एका दिवसात कमी डेटा वापरला तर दुसऱ्या दिवशी जास्त डेटा वापरता येतो.