आत्तापर्यंत तुम्ही फक्त एसीची सर्विस किंवा काळजी कशी घ्यावी याबद्दल बरेच वाचले असेल. पण एअर कंडिशनरमधून बाहेर पडणारे पाणी थांबले तर काय होईल हे तुम्हाला माहिती आहे का? येथे आम्ही तुम्हाला फक्त याबद्दलच सांगणार आहोत.
एअर कंडिशनरमधून पाणी न येण्याचे कारण
ड्रेन पाईपमध्ये अडथळा: हे सर्वात सामान्य कारण आहे. जर ड्रेन पाईपमध्ये घाण किंवा बुरशी अडकली असेल तर पाणी बाहेर पडू शकणार नाही.
ड्रेन पॅनमध्ये अडथळा: ड्रेन पॅन ही एअर कंडिशनरच्या आत असलेली जागा आहे जिथे पाणी जमा होते आणि नंतर ड्रेन पाईपमधून बाहेर वाहते. ड्रेनेज पॅनमध्ये घाण किंवा कचरा साचल्यास, पाणी बाहेर बडणार नाही.
खराब पंप: काही एअर कंडिशनरमध्ये एक पंप असतो जो ड्रेन पाईपमधून पाणी बाहेर काढण्यास मदत करतो. पंप तुटल्यास पाणी साचून बाहेर पडणार नाही.
इवापोरेटर कॉइल्सवर बर्फ साचणे: इवापोरेटर कॉइल जास्त थंड झाल्यास त्यावर बर्फ तयार होऊ शकतो. हा बर्फ वितळून पाण्यात बदलेल, जो ड्रेन पाईपमधून बाहेर पडू शकणार नाही.
रेफ्रिजरंट गॅस लीकेज: एअर कंडिशनरमध्ये रेफ्रिजरंट गॅस लीक झाल्यास, ते थंड करण्याची क्षमता कमी करू शकते, परिणामी इवापोरेटर कॉइलवर बर्फ तयार होतो आणि ड्रेनेज समस्या उद्भवू शकतात.
एअर कंडिशनरमधून पाणी बाहेर न आल्याने काय होते?
जर तुमच्या एअर कंडिशनरमधून पाणी येत नसेल तर एसीमध्ये शॉर्ट सर्किट होऊ शकते आणि कॉम्प्रेसरमध्ये गळती देखील होऊ शकते. त्यामुळे एसीमधून पाणी येणे थांबले की लगेच दुरुस्त करून घ्या, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.