(शैलेश चौधरी)
एरंडोल: येथे तहसिलदार यांच्या दालनात शुक्रवारी ८ऑक्टों. रोजी वात्सल्य समीतीच्या अध्यक्षा तथा तहसिलदार सुचेता चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. लोकसंघर्ष मोर्चा च्या नेत्या प्रतीभाताई शिंदे यांची खास उपस्थिती यावेळी होती.
एरंडोल तालुक्यात कोरोना मुळे पती, मुलगा गमावलेल्या निराधार महीला व १ पालक अथवा दोन्ही पालक गमावलेल्या मुलांचा गावनिहाय सर्व्हे करावा,अश्या निराधार महीलांना तात्काळ अन्नसुरक्षा योजनेचा लाभ, निराधार पेंशन योजना, कुटुंबसहाय्य योजनेंतर्गत २० हजार रूपये तात्काळ द्यावेत,पतीच्या मृत्यूनंतर कागदपञ उपलब्ध नसलेल्या महीलांसाठी कँम्प लावावेत,समृध्द गाव-विकास योजना मनरेगाअंतर्गत योजनांचा लाभ द्यावा.
ज्या महीलांकडे शेती आहे त्यांना शेतीपूरक उद्योगांना अनुदान व बिनव्याजी कर्ज मिळावे, सुप्रिम कोर्टाच्या निकालानुसार सर्वांना पन्नास हजार रूपये अनुदान तात्काळ द्यावे.
१पालक गमावलेल्या मुलांना तात्काळ बालसंगोपन अनुदान महीना १२५०रूपये द्यावे, दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना ५लाख रूपयांची मदत द्यावी. असे मुद्दे बैठकीत उपस्थित करण्यात आले.
आठवडभरात गावनिहाय सर्व्हे पूर्ण करून योजनांचा योग्य तो लाभ देण्यात येईल अशी ग्वाही तहसिलदार सुचेता चव्हाण यांनी यावेळी दिली.
या बैठकीस सुप्रिया चव्हाण,तेजस्विता जाधव, कोरोनामुळे विधवा झालेल्या एकल महीला,नगरसेवक सुरेश पाटील, सुनिल मराठे,गजानन महाजन,किरण बोरसे,रेवानंद ठाकूर आदी उपस्थित होते.