सर्च हिस्ट्री डिलीट करण्यासाठी वापरा ही पद्धत, नाही तर Riyan Parag सारखी होईल फजिती

हल्ली अनेकांचा ऑनलाइन वावर इतका सहज झाला आहे की आपण काय शेयर करत आहोत याकडे लक्ष जात नाही. अशीच एक घटना आयपीएलच्या राजस्थान रॉयल संघाचा खेळाडू रियान पराग सोबत झाली होती. युट्युबवर व्हिडीओ स्ट्रीमिंग करत असताना रियानची युट्युब सर्च हिस्ट्री दिसली आणि तो ट्रोल झाला. तुम्ही सर्च हिस्ट्री एक पर्सनल माहिती असते आणि यावरून लोक तुमच्याविषयी मत बनवू शकतात.

तर या प्रकरणामुळे एक गोष्ट समजली आहे की जर तुमची सर्च हिस्ट्री लीक झाली तर तुम्हाला ट्रोल केलं जाऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला तुमची क्रोम आणि युट्युब सर्च हिस्ट्री ऑटो डिलीट मोडवर सेट करू शकता. त्यामुळे कधी तुमचा फोन कोणाच्या हातात गेला तर त्यांना आला कणांहिस्ट्री दिसणार नाही. ऑटो डिलीट मोड कसा सेट करायचा याची माहिती घेऊया.

YouTube वॉच हिस्ट्री ऑटो डिलीट

यासाठी फोनमध्ये युट्युब ओपन करा, उजवीकडे असलेल्या प्रोफाईल आयकॉनवर क्लिक करा. असं केल्यावर Your data in YouTube च्या ऑप्शनवर क्लिक करा. थोडं खाली स्क्रोल करा आणि Manage your YouTube Watch history च्या ऑप्शन वर क्लिक करा. इथे तुम्हाला ऑटो-डिलीटच्या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर टाइम ड्यूरेशन सिलेक्ट करा. त्यानंतर नेक्स्टवर जा, त्यानंतर ऑटो डिलीट फीचर अ‍ॅक्टिव्हेट होईल. म्हणजे आता जे टाइम ड्यूरेशन सिलेक्ट केलं असेल त्या कालावधीनंतर हिस्ट्री आपोआप डिलीट होईल.
Google Maps वर टाका तुमच्या घर, ऑफिस किंवा दुकानाचा पत्ता, जाणून घ्या पद्धत

क्रोम सर्च हिस्ट्री अशी होईल आपोआप डिलीट

तुम्ही तुमच्या गुगल सर्च हिस्ट्री देखील ऑटो मोडवर सेट करू शकता. असं केल्यास गुगलवरील तुमची सर्च हिस्ट्री आपोआप डिलीट होईल. गुगल यासाठी 3, 18 आणि 36 महिन्याचे ऑप्शन देत आहे. यासाठी सर्वप्रथम क्रोम ब्राउजरमध्ये गुगल माय अ‍ॅक्टिव्हिटी पेजवर जा, त्यानंतर वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी सिलेक्ट करा. खाली दिसत असलेल्या ऑटो डिलीट ऑप्शनवर जा. ऑटो डिलीट ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर टाइम सिलेक्ट करा. कंटीन्यू करा आणि कंफर्मवर क्लिक करा.

Source link

riyan paragriyan parag search historyriyan parag trolledyoutube historyyoutube history auto deleteयुट्युब हिस्ट्रीरियान पराग
Comments (0)
Add Comment