Shani Jayanti 2024 : शनि जयंतीच्या दिवशी करा या गोष्टी, साडेसातीपासून मिळेल सुटका

Shani Jayanti 2024 Tithi :

हिंदू पंचागानुसार शनि जयंतीला विशेष असे महत्त्व आहे. दरवर्षी वैशाख मासातील अमावस्या तिथीला शनि जयंती साजरी केली जाते. यंदा ही शनि जयंती ६ जून २०२४ ला गुरुवारी आहे.

वैशाख महिन्यातील अमावस्या तिथी ५ जूनला संध्याकाळी ७ वाजून ५४ मिनिटांनी सुरु होईल तर ६ जूनला संध्याकाळी ६ वाजून ७ मिनिटांनी संपेल. त्यामुळे उदय तिथीनुसार शनि जयंती ६ जूनला साजरी केली जाईल.

धार्मिक मान्येतनुसार या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. तसेच शुभ परिणामही मिळतात. शनिदेवाला कर्माचा आणि न्यायाचा देवता म्हटले जाते. त्यांची मनोभावे पूजा केल्याने जीवनातील अनेक अडचणी दूर होतात. जर तुमच्या कुंडलीत साडेसाती असेल तर शनि जयंतीला हे उपाय करुन पाहा.

1. शनि जयंती महत्त्व आणि शुभ मुहूर्त

शनिदेवाची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी शनि जयंती हा सर्वात शुभ दिवस मानला जातो. शनि जयंती ६ जून ला आहे. या दिवशी पूजा केल्याने शनिदेवाची कृपा तुमच्यावर कायम राहाते. सूर्यास्ताच्या वेळी शनिदेवाची पूजा केल्याने शनिदेवाची विशेष कृपा होते, अशी पौराणिक मान्यता आहे. शनीच्या साडेसातीचा त्रास होत असेल तर शनि जयंतीला शनिदेवाची पूजा अवश्य करा.

2. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी पूजा पद्धत

  1. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करावे.
  2. यादिवशी निळ्या किंवा काळ्या रंगाचे कपडे परिधान करा.
  3. शनि मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलात काळे तीळ घालून शनिदेवाला अर्पण करा.
  4. यानंतर शनिदेवाच्या समोर दिवा लावा त्यांचा आशीर्वाद घ्या
  5. शनिचालिसाचे पठण देखील करा.

3. शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी काय कराल?

  1. शनिदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लाल फुलांऐवजी निळी फुले अर्पण करा.
  2. शनि जयंतीला पाणी आणि कच्च्या दुधात पिंपळाच्या झाडाच्या पारंब्या अर्पण केल्याने कुंडलीतील शनीचा नकारात्मक प्रभाव कमी होतो.

टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.

Source link

Shani Jayanti 2024Shani Jayanti 2024 DateShani Jayanti 2024 ImportanceShani Jayanti 2024 MuhuratShani Jayanti 2024 Tithiशनि जयंतीशनिदेवसाडेसाती
Comments (0)
Add Comment