Shami Plant Upay : करिअर आणि व्यवसायात मिळेल भरभरुन यश, शमी प्लांटचा घरात असा करा वापर

Shami Plant Puja :

हिंदू धर्मात अनेक झाडांना पूजनीय स्थान दिले आहे. घरात शमीचे झाड लावल्याने आपल्याला अनेक प्रकारे फायदे मिळतात. प्रत्येक वनस्पतीमध्ये एक वेगळ्या प्रकारची गुणवत्ता असते. तसेच त्याच्यात सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी देखील दडलेल्या असतात.

काही वनस्पती या घराचे सौंदर्य तर वाढवतात त्याच बरोबर आपल्या रखडलेल्या कामांना गती देखील देतात. त्यातील एक शमीचे झाड. शमीचे झाड हे पूजेसाठी खास मानले जाते. याचा संबंध शनिदेवाशी येतो. या वनस्पतीमुळे जीवनातील सर्व समस्या आणि संकट दूर होते असे म्हटले जाते.

शमीच्या झाडाचा संबंध भगवान शंकर आणि शनिदेव या दोघांशी येतो. याचे झाड घराच्या अंगणात लावल्याने सुख-समृद्धी वाढते. शिवपुराणात शमीच्या झाडाचे अनेक उपाय देखील सांगण्यात आले आहे.

असे मानले जाते की, या उपायांचे पालन केल्याने व्यक्तीला जीवनातील सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते. जाणून घेऊया करिअर व्यवसायात यश मिळवण्यासाठी शमीच्या झाडाचे कोणते उपाय करायला हवे.

जर तुमच्यावर सतत कर्जाचा डोंगर चढत असेल किंवा कर्जाची समस्या सतावत असेल तर शनिवारी विधीपूर्वक शमीच्या झाडाची पूजा करा. तसेच काळे उडीद, तीळ अर्पण करा. असे केल्याने कर्जापासून सुटका होईल तसेच आर्थिक चणचण कमी होईल.

तुम्ही सतत आजारी पडत असाल तर पाण्यात दूध मिसळून शमीच्या झाडाला अर्पण करावे. या वेळी अवधूतेश्वर महादेवाचे नामस्मरण करावे. असे मानले जाते की, हा उपाय केल्याने सर्व रोग दूर होतात.

शनिवारी सकाळी आंघोळ करुन शमीच्या रोपाची पूजा करावी. तसेच त्याचे पान पर्समध्ये ठेवा. यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होते असे म्हटले जाते.
सोमवार किंवा शनिवारी शमीच्या झाडाच्या फांदीला कलव बांधा. असे मानले जाते की, हा उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि त्याचा आशीर्वाद मिळतो. राहू दोषापासूनही तुम्हाला आराम मिळेल.

करिअर आणि व्यवसायात यश मिळवायचे असेल तर शनिवारी शमीच्या रोपाला पाणी अर्पण करा. यामुळे करिअरमध्ये अपेक्षित यश मिळते.

टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.

Source link

Astrology Remediesshami plant Pujashami plant upayshami plant vidhiVastu Tipsवास्तू टिप्सव्यवसायात मिळेल यशशमीचे झाड करिअर उपाय
Comments (0)
Add Comment