Flipkartवर लिस्ट करण्यात आलेल्या डिटेल्सनुसार, या सेल दरम्यान जास्तीत जास्त 80 टक्के सूट मिळू शकते. स्मार्ट गॅझेट्स आणि ॲक्सेसरीजवर 50-80% पर्यंत सूट मिळू शकते. याशिवाय स्मार्टफोनवरही डिस्काउंट उपलब्ध आहेत.
फ्लिपकार्ट UPI वर देखील सूट
फ्लिपकार्ट सेल दरम्यान, ग्राहक त्वरित 10% सूट घेऊ शकतात. यासाठी तुम्हाला फ्लिपकार्ट UPI वापरावे लागेल, ज्यात काही नियम आणि अटी आहेत.
स्मार्टफोनवर देखील सुट उपलब्ध आहे
फ्लिपकार्ट सेल दरम्यानही अनेक स्मार्टफोन्स लिस्ट करण्यात आले आहेत. येथे स्वस्तात अनेक हँडसेट खरेदी करण्याची संधी आहे. आयफोनपासून ते अनेक अँड्रॉइड स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करता येतात. या कालावधीत मोटोरोला, रेडमी आणि सॅमसंगसह अनेक ब्रँडच्या फोनवर सुट मिळत आहे.
TWS पासून पॉवर बँक पर्यंत सूट उपलब्ध आहे
फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये स्मार्ट गॅजेट्स देखील उपलब्ध आहेत, जे चांगल्या सवलतींसह खरेदी केले जाऊ शकतात. या सेलमध्ये तुम्ही हेडफोन, TWS, स्मार्टवॉच, मोबाइल ॲक्सेसरीज, स्पीकर आणि साउंडबार, पॉवर बँक आणि स्मार्ट होम डिव्हाइसेस खरेदी करू शकता.
ब्रँडेड शूज आणि कपड्यांवरही सूट
फ्लिपकार्ट सेलमध्ये ब्रँडेड शूज, कपडे आणि घड्याळे सवलतीने खरेदी करता येतील. कंपनीचा दावा आहे की अनेक कपड्यांवर 80% पर्यंत सूट मिळू शकते. एवढेच नाही तर प्युमा शूजवर किमान ५०% पर्यंत सूट मिळेल.
ऑफर अधिकृत ॲपवर दिसत आहेत ऑफर्स
दोन दिवसांपूर्वीच, SAIL ची मायक्रो साइट लाइव्ह झाली आहे, कंपनीच्या अधिकृत साईट किंवा ॲपवरुन तुम्ही यात एंट्री करू शकता, आणि तुम्ही ऍप्लीकेशन देऊन या आकर्षक ऑफर्स मिळवू शकतात.