Airtelच्या या प्लॅन्समध्ये मिळेल Disney+ Hotstarची फ्री मेंबरशिप
Airtelचा 499 रुपयांचा प्लॅन
Airtelच्या नवीन प्रीपेड प्लॅनच्या लिस्टमधील पहिला प्लॅन 499 रुपयांपासून सुरू होतो. हा प्लान 28 दिवसांची व्हॅलिडिटी, 3GB हाय-स्पीड डेटा आणि तीन महिन्यांच्या Disney+ Hotstar सबस्क्रिप्शनसह येतो. याशिवाय ग्राहकांना या प्लॅनमध्ये Airtel Xstream Play द्वारे 20 पेक्षा जास्त OTT प्लॅटफॉर्मची मेंबरशिप मिळते.
Airtelचा 839 रुपयांचा प्लॅन
एअरटेलने 839 रुपयांचा प्लॅन आणला आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 84 दिवस आहे. प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये डिस्ने + हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन तीन महिन्यांसाठी उपलब्ध आहे. याशिवाय एअरटेल एक्सस्ट्रीम प्लेसह या प्लॅनमध्ये 20 हून अधिक OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन दिले जात आहे.
Airtelचा 3359 रुपयांचा प्लॅन
जर तुम्हाला एअरटेलच्या दीर्घ व्हॅलिडिटी प्लॅनसह रिचार्ज करायचे असेल, तर तुमच्यासाठी 3359 रुपयांचा वार्षिक प्लॅन सर्वोत्तम असेल. या प्लॅनमध्ये दररोज 2.5GB डेटा मिळतो. प्लॅनची व्हॅलिडिटी वर्षभरासाठी म्हणजेच पूर्ण 365 दिवसांसाठी आहे. या प्लॅनमध्ये डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शन एका वर्षासाठी उपलब्ध आहे आणि अनेक OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन देखील दिले जाते.
Airtel सर्व पोस्टपेड प्लॅनसह 1 वर्षासाठी Disney+ Hotstar ऑफर करत आहे.
Airtel सध्या सर्व पोस्टपेड युजर्सना अनलिमिटेड 5G डेटा, कौटुंबिक ॲड-ऑन फायदे आणि Xstream ॲपवर 20 पेक्षा जास्त OTT प्लॅटफॉर्मवर प्रवेशासह एक वर्षाचे Disney+ Hotstarची मेंबरशिप देत आहे.
Airtel ब्रॉडबँड प्लॅनमध्ये ही मिळेल Disney+Hotstarचे सबस्क्रिप्शन
एअरटेलनेही क्रिकेट चाहत्यांसाठी आपल्या होम ब्रॉडबँड प्लॅन्समध्ये वाढ केली आहे. 999 रुपये, 1498 रुपये आणि 3999 रुपयांपासून पासून सुरू होणारे प्लॅन्स आता हाय-स्पीड इंटरनेटसह Disney+ Hotstarची मेंबरशिप देत आहेत. या प्लॅनमध्ये 350+ चॅनेल देखील उपलब्ध आहेत जेणेकरुन युजर्स आरामात टीव्ही पाहू शकतील.