टिप्सटर Smart Pikachu नं चीनच्या मेसेजिंग प्लॅटफॉर्म Weibo वर एक पोस्टमध्ये सांगितलं आहे की GT 7 Pro मध्ये पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा हाय ऑप्टिकल झूम लेव्हल सह दिला जाऊ शकतो. यात सिक्योरिटीसाठी अल्ट्रासॉनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असू शकतो. याआधी एक लीकमध्ये सांगण्यात आलं होतं की या स्मार्टफोनमध्ये Qualcomm चा आगामी Snapdragon 8 Gen 4 SoC दिला जाऊ शकतो.
Realme GT 6 या आठवड्यात भारत आणि इंटरनॅशनल मार्केट्समध्ये लाँच केला जाईल. अलीकडेच कंपनीनं GT 6T सादर केला होता. Realme GT 6 म्हणजे Realme GT Neo 6 चा रिब्रँडेड व्हर्जन असण्याची शक्यता आहे. अलीकडेच हा स्मार्टफोन चीनमध्ये आला होता. GT 6 मध्ये प्रीमियम फीचर्स आणि AI फीचर्स दिले जाऊ शकतात. Realme GT 6T सह GT सीरीज दोन वर्षांनी इंटरनॅशनल मार्केटमध्ये आली आहे. Realme GT 6 GT Neo 6 चा रिब्रँडेड व्हर्जन म्हणून सादर केला जाऊ शकतो. या महिन्याच्या सुरुवातीला Realme GT Neo 6 चीनमध्ये लाँच केला गेला होता. या स्मार्टफोनच्या 12GB रॅम व 256GB व्हेरिएंटची किंमत 2,099 चायनीज युआन (जवळपास 22,000 रुपये) आहे.
अलीकडेच कंपनीनं देशात Narzo N65 5G लाँच करण्यात आला होता. यात प्रोसेसर म्हणून MediaTek Dimensity 6300 चिपसेट देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये HD+ डिस्प्ले 120 Hz रिफ्रेश रेटसह आहे. यातील 5,000 mAh ची बॅटरी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या स्मार्टफोनच्या 4GB RAM व 128 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 11,499 रुपये आणि 6GB रॅम व 128GB स्टोरेज मॉडेल 12,499 रुपयांना खरेदी करता येईल. हा Amber Gold आणि Deep Green कलर्स मध्ये उपलब्ध झाला आहे.