खूप दिवसांपासून प्रयत्नात
मिस्टर बीस्ट बर्याच काळापासून नंबर 1 यूट्यूबर बनण्याचा प्रयत्न करत होता. आता त्याने हे स्थान गाठले आहे. यामध्ये त्यांनी भारतीय संगीत कंपनी टी-सीरीजला मागे टाकले आहे. याआधी टी-सीरीजचे सर्वाधिक सब्सक्राइबर्स होते. हे जाणून घ्या की, बीस्ट त्याच्या चॅनलवर चॅलेंज, गिवे, स्टंट यांसारखे व्हिडिओ पोस्ट करतो जे लोकांना खूप आवडतात.
मिस्टर बीस्टने शेअर केली पोस्ट
मिस्टर बिस्ट हे फक्त 26 वर्षांचे आहेत आणि त्यांनी ‘X’ वर याबद्दल एक पोस्ट देखील लिहिली आहे. त्याने अखेर 6 वर्षांनी PewDiePie चा बदला घेतला. कारण याआधीही याबाबत यूट्यूबवर वाद झाला होता आणि Pwediepie सोबतच्या स्पर्धेत T-Series ने बाजी मारली होती. 100 कोटी सब्सक्राइबर्सवरून दोघांमध्ये हा वाद झाला होता.
किती कमावतो हा यूट्यूबर?
आता प्रश्न असा आहे की मिस्टर बीस्ट यूट्यूब वरून किती कमावतो? त्याच्या प्रत्येक व्हिडिओला कोट्यवधी व्ह्यूज मिळतात. त्याचा नेमका आकडा अवघड असला तरी त्याचा अंदाज नक्कीच लावता येईल. त्याच्या व्हिडिओंना दररोज 1 कोटी व्ह्यूज मिळतात. जर त्यांना 1 हजार व्ह्यूजसाठी 3 डॉलर्स मिळतात, तर त्यांना दररोज अंदाजे 30 हजार डॉलर्स मिळतात. इतर सर्व घटकांचा समावेश केल्यानंतर, PayCheck.in दावा करते की मिस्टर बीस्ट दररोज 2.62 कोटी रुपये कमवतो. म्हणजेच तो एका महिन्यात 56.91 कोटी रुपये कमावतो.