Budhvarche Upay : श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी बुधवारी करा हे उपाय, घरातील दरिद्रता होईल दूर!

Wednesday Astrology :

हिंदू धर्मातील सर्व दिवसांना धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांना नवग्रहाची नावे देखील देण्यात आली आहे. प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पण केला गेला आहे.

बुधवारचे अनेक धार्मिक महत्त्वही आहे. हा दिवस श्रीगणेशाला समर्पित करण्यात आला आहे. ज्योतिषशास्त्रात बुध ग्रह हा बुद्धिमत्ता, बुद्धी आणि निर्णय क्षमता वाढविणारा कारक मानला जातो.

जर तुमच्याकडे बुद्धिमत्ता, विवेकबुद्धी आणि उत्तम निर्णय घेण्याची क्षमता असेल तर तुम्ही नेहमी योग्य दिशेने कार्य कराल. त्यामुळे तुमच्या आजूबाजूला दारिद्रय निर्माण होणार नाही. जेव्हा कुंडलीतील बुध ग्रह कमजोर असतो तेव्हा त्यांना आर्थिक, नोकरी, व्यवसाय या समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच यामुळे नात्यावर देखील परिणाम होतो.

बुधवारचा दिवस श्रीगणेशाशी संबंधित आहे. श्रीगणेशाच्या उपासनेने शुभ-लाभ, ज्ञान आणि संपत्ती मिळते. तसेच जीवनातून दारिद्रय दूर होते. बुधवारी तुम्ही काही विशिष्ट उपाय केले तर त्यांचा तुमच्या आयुष्यावर चांगला परिणाम होईल.

1. गणपतीला गुळाचा नैवेद्य अर्पण करा

गणपतीला गोडाचे पदार्थ खूप आवडतात. जर तुम्ही नियमितपणे ७ बुधवारी गणपतीला गोड पदार्थ अर्पण केले तर धनाशी संबंधित समस्या लवकर दूर होतील. श्रीगणेशाला गूळ अर्पण करणे खूप फायदेशीर ठरते. तसेच घरातील गणपतीच्या मूर्तीला गुळ अर्पण केल्याने तुमच्या जीवनातील अडचणी कमी होतील.

2. गाईला हिरवा चारा खाऊ घाला

हिंदू धर्मात गाईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच तिची पूजा केली जाते. म्हणून जर तुम्ही बुधवारी गाईला हिरवे गवत खाऊ घातल्याने तुमच्या जीवनातील गरीबी दूर होईल. तसेच अनेक योग्य मार्ग दिसू लागतील.

3. बुधवारी रुद्राक्ष धारण करा

बुधवारी गणेश रुद्राक्ष धारण करा. हा रुद्राक्ष धारण केल्याने तुम्हाला सर्व प्रकारची रिद्धी-सिद्धी प्राप्त होते. यामुळे तुमची स्मरणशक्ती तीक्ष्ण होते. तुमची बुद्धीमत्ता एकाग्र होते. एखाद्या गोष्टीचा मानसिक ताण असेल तर हा रुद्राक्ष धारण केल्याने तोही कमी होतो.

टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.

Source link

astrology WednesdayBudhwarche UpayWednesday astrologyWednesday remediesWednesday upayबुधवार
Comments (0)
Add Comment