Loksabha Election Result 2024: जागा कमी वैगरे काही नाही हा तर स्पष्ट पराभवच; भाजपचे कुठे आणि काय चुकले? पाच गोष्टी ठरल्या आत्मघातकी

नवी दिल्ली: 1 जून 2024 रोजी संध्याकाळी 6:30 वाजता एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली आणि भाजप-एनडीएला प्रचंड बहुमताचा अंदाज वर्तवण्यात आला. बहुतेक एक्झिट पोलने एनडीएला 350 पेक्षा जास्त जागांचा अंदाज वर्तवला होता, काहींना तर 400 च्या जवळपासही जागा मिळतील. पण तीन दिवसांनंतर समोर आलेल्या वास्तविक निवडणुकीच्या निकालांनी सर्वांनाच धक्का दिला आहे. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या प्रमुख राज्यांमध्ये भाजपचा संघर्ष सुरू आहे. काँग्रेस आणि समाजवादी पक्षासह विविध विरोधी पक्षांनी जोरदार कमबॅक केले. भाजपसाठी धक्कादायक ठरलेल्या या निकालाची कारणे तरी काय आहेत, जाणून घेऊयात…

१) सर्वप्रथम, भाजपने त्यांच्या प्रचारात “मोदी जादूवर” जास्त विसंबून ठेवले. गेल्या दोन महिन्यांत त्यांची निवडणूक रणनीती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवतीच फिरत होती. मात्र, रॅली आणि सभांमध्ये स्थानिक मुद्द्यांकडे छोट्या-मोठ्या पक्षांच्या नेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होते. संपूर्ण लक्ष पंतप्रधान मोदींच्या करिष्म्यावर होते. या अलिप्ततेचा अर्थ भाजप उमेदवार आणि कार्यकर्ते जनतेशी संपर्क साधण्यात अयशस्वी ठरले, ज्यामुळे पक्षाला धक्का बसला. दुसरीकडे, विरोधकांनी महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांचे भांडवल करून मतदारांच्या नाराजीचा सूर लावला.
Lok Sabha 2024 UP Result: उत्तर प्रदेशात अतिआत्मविश्वास नडला; व्होट बँक कशामुळे घटली, भाजपच्या पराभवाची पाच कारणे

२) दुसरे म्हणजे, अनेक गंभीर मुद्द्यांवरून भाजपला त्यांच्याच मतदारांच्या संतापाचा सामना करावा लागला. अग्निवीर आणि पेपरफुटीसारख्या वादांनी भाजपच्या विरोधात भूमिका बजावली. अग्निवीरच्या अंतर्गत चार वर्षांच्या लष्करी सेवेनंतर मतदारांना त्यांच्या मुलांच्या भविष्याची चिंता होती. पेपरफुटीच्या घटनांबाबत तरुणांच्या संतापाला भाजपने कमी लेखले. पोलीस भरती परीक्षेवर लखनौमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेला निदर्शने याचा पुरावा आहे. या चिंतेकडे लक्ष देण्याऐवजी पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या समर्थकांना खूश करण्यासाठी घोषणाबाजी केली.
Lok Sabha Election 2024 Result : ३७० आणि ४०० पार तर सोडा; इथे भाजपला साधे बहुमत मिळण्याचे वांदे, निवडणूक आयोगाची अधिकृत आकडेवारी पाहून पोटात येईल गोळा

३) महागाईचा निवडणुकीवर होणारा परिणाम नजरेआड करता येणार नाही. पेट्रोल, डिझेल आणि खाद्यपदार्थांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सरकारविरोधात व्यापक असंतोष निर्माण झाला. गॅस सिलिंडर आणि इतर घरगुती जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीवर लक्ष केंद्रित करून विरोधकांनी हा मुद्दा चपखलपणे अधोरेखित केला. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर थेट टीका करत, वाढत्या महागाईला त्यांच्या आर्थिक धोरणांना जबाबदार धरले. याउलट, भाजप नेते आणि केंद्र सरकारच्या मंत्र्यांनी ठोस उपाय न करता प्रामुख्याने फक्त आश्वासने दिली.

४) 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बेरोजगारी हा आणखी एक प्रमुख घटक होता. या आघाडीवर विरोधकांनी सातत्याने सरकारवर हल्लाबोल करत उत्तर आणि जबाबदारी घेण्याची मागणी केली. केंद्रात सत्तेत आल्यास ३० लाख सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्वासन काँग्रेसच्या जाहीरनाम्यात देण्यात आले होते. राम मंदिर, सीएए आणि समान नागरी संहितेच्या घोषण हे भाजपचे केंद्रबिंदू होते. पण बेरोजगारीमुळे निर्माण झालेल्या नकारात्मक भावनांचा समतोल साधू शकले नाहीत हेच या निकालातून समोर आले.

५) भाजपला स्थानिकांच्या नाराजीचाही सामना करावा लागला. अनेक जागांवर तिकीट वाटपावरून असलेली नाराजी मतदानाच्या दिवसापर्यंत कायम होता. या न सुटलेल्या कोड्यामुळे केवळ पक्ष कार्यकर्त्यांमध्येच नाही तर काही मतदारसंघातील उच्चवर्णीय मतदारांमध्येही असंतोष निर्माण झाला. एकूणच, दैनंदिन लोकांच्या प्रश्नांपासून अलिप्त मुद्द्यांवर भाजप विसंबून राहिल्याने त्यांच्या निवडणुकीतील घसरणीत महत्त्वाची भूमिका बजावली.

Source link

know five reason of bjp defeatlok sabha election 2024Lok Sabha Election Result 2024Loksabha Election Result 2024where and what did bjp go wrongभाजपच्या पराभवाची पाच कारणेलोकसभा निवडणूक २०२४
Comments (0)
Add Comment